नागरिकांच्या दक्षतेमुळे मनोरुग्णांवर उपचार

शिक्रापूर : सध्या सर्वत्र गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना अनेक ठिकाणचे खासगी हॉस्पिटल देखील बंद पडलेले असून अशा परिस्थितीमध्ये सुद्धा शिरूर तालुक्यात रस्त्यावर राहणाऱ्या मनोरुग्णावर उपचार मिळाले असून त्यामळे त्याला जीवन जगण्यास प्रेरणा मिळाली आहे.

 शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील घटना

शिक्रापूर  : सध्या सर्वत्र गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना अनेक ठिकाणचे खासगी हॉस्पिटल देखील बंद पडलेले असून अशा परिस्थितीमध्ये सुद्धा शिरूर तालुक्यात रस्त्यावर राहणाऱ्या मनोरुग्णावर उपचार मिळाले असून त्यामळे त्याला जीवन जगण्यास प्रेरणा मिळाली आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) परिसरातील काही अनेक मनोरुग्ण व भिकारी यांना शिक्रापूर येथील चंद्रमा हॉटेल येथून दररोज जेवण पुरविले जात असून हे जेवण सदर लोकांना जेवण पुरविणारे पतंजली योग समितीचे अध्यक्ष अंकुश घारे व ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष रमेश टाकळकर यांना कोरेगाव भीमा येथील वाडागाव फाटा जवळ एक मनोरुग्ण दोन दिवसांपासून आजारी असल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांनी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमधून सदर रुग्णास शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले त्याचे नाव पत्ता विचारले असता तो फक्त लाला आप्पा कोळी एवढेच नाव सांगत होता. त्यांनतर त्याची तपासणी केली असता त्याच्या हाताला जुनी मोठी जखम झालेली असल्यामुळे त्याला जास्त त्रास झालेला असल्याचे समोर आले. त्यांनतर त्या मनोरुग्नावर ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्याला व्यवस्थित झाल्यानंतर पुन्हा पतंजली योग समितीचे अध्यक्ष अंकुश घारे यांच्या ताब्यात देत त्याला सध्याच्या लॉकडाऊन मुळे पुन्हा त्याच्या जागेवर नेऊन सोडण्यात आले आहे. तर याबाबत बोलताना लॉकडाऊन संपल्यानंतर लवकरच परिसरातील सर्व मनोरुग्ण नागरिकांना आमच्या मित्र मंडळींच्या मदतीने मनोरुग्ण हॉस्पिटल अथवा संस्था येथे दाखल करणार असल्याचे पतंजली योग समितीचे अध्यक्ष अंकुश घारे व ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष रमेश टाकळकर यांनी सांगितले.
-नागरिकांचे कार्य कौतुकास्पद : डॉ. वैजिनाथ काशीद
शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात घारे व टाकळकर यांनी रुग्णवाहिकेच्या मदतीने एका मनोरुग्णाला आणल. एकीकडे सध्याची परिस्थिती पाहता कोणी कोणाला जवळ करत नाही, परंतु सदर व्यक्तींनी त्या मनोरुग्णाला कोणतीही तमा न बाळगता उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले त्यामुळे सदर नागरिकांचे कार्य हे कौतुकास्पद असल्याचे मत शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैजिनाथ काशीद यांनी व्यक्त केले.