तुकाराम महाराजांची पालखी इंदापूरातून पंढरपूरकडे मार्गस्थ

    इंदापूर : सोमवारी दुपारी अडीच ते साडेतीन या कालावधीत एक तासाची चुटपूट लावणारी विश्रांती घेत ४० वारकऱ्यांच्या उपस्थितीतील ‘शिवशाही’मधून आलेली संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी इंदापूरातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.  ज्या ठिकाणी दरवर्षी रिंगण सोहळा होतो. त्या रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुराबाई कदम विद्यालयाच्या प्रांगणात दुपारी अडीच वाजता पालखी विसाव्यासाठी थांबली.

    बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अधिकारी नारायण शिरगावकर, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार अनिल ठोंबरे, सोनाली मेटकरी, नगराध्यक्षा अंकिता शहा, मुख्याधिकारी रामराजे कापरे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.एकनाथ चंदनशिवे, डॉ.सुहास शेळके, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, नगरसेवक भरत शहा, माजी नगरसेवक प्रशांत शिताप, सुनिल मोहिते, राजेंद्र चौगुले आदिंनी पालखीचे दर्शन घेतले. प्रशासनाने वारक-यांच्या अल्पोपहाराची सोय केली होती. साडेतीन वाजता पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.