बाजार समितीतील व्यावसायिकांकडून साडेबारा किलो प्लास्टीक जप्त

पिंपरी : प्लास्टीक बंदी बाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभाग व भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईत मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती येथील व्यावसायिकांकडून साडे बारा किलो प्लास्टीक जप्त करुन २५ हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली.

महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आरोग्य अधिकारी बी. बी. कांबळे, विजय दवाळे, पोलिस निरिक्षक गिरणार, भांडे, आरोग्य निरिक्षक अंकुश झीटे, वैभव कांचनगौडा, आरोग्य मुकादम रविंद्र गायकवाड यांच्यासह आरोग्य आणि पोलिस कर्मचारी या कारवाईत शामिल होते.

आज डॉ. रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या क प्रभाग व भोसरी पोलीस शाखा यांच्यातर्फे संयुक्तरित्या बाजार समिती मोशी मार्केट येथे केलेल्या कारवाईत सुमारे ४० व्यावसायिकांची तपासणी करणेत आली. त्यातील ५ व्यावसायिकांकडुन बंदी असलेल्या प्लॅस्टीक वापराबाबत सुमारे २५ हजार प्रशासकीय शुल्क वसुन करुन सुमारे १२.५ किलो प्लॅस्टीक जप्त करण्यात आले.