संचलन तुटीपोटी पीएमपीएमएलला एका महिन्याचे बारा कोटी देणार

महापालिकेच्या सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात पीएमपीएमएल निधी या लेखाशिर्षावर २३८ कोटी २१ लाखाची तरतुद करण्यात आली आहे. यामध्ये संचलन तुट १६५ कोटी ७१ लाख रूपये, विविध प्रकारचे पास २ कोटी ५० लाख, बस खरेदी ७० कोटी असा खर्च गृहित धरण्यात आला आहे.

    पिंपरी: पिंपरी – चिंचवड महापालिकेतर्फे पीएमपीएमएलला संचलन तुटीपोटी मे २०२१ या एका महिन्यांकरिता १२ कोटी रूपये आगाऊ स्वरूपात देण्यात येणार आहेत.

    पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडील २६ एप्रिल २०२१ रोजीच्या पत्रान्वये सन २०२०-२१ ची अंदाजित संचलन तुट ५१४ कोटी २८ लाख रूपये गृहित धरण्यात आली आहे. त्यापैकी ४० टक्क्यानुसार पिपरी – चिंचवड महापालिकेचा संचलन तुटीचा हिस्सा २०५ कोटी ७१ लाख रूपये आहे. मे २०२१ करिता १७ कोटी १४ लाख रूपये संचलन तुटीचे द्यावेत, अशी विनंती केली आहे.

    महापालिकेच्या सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात पीएमपीएमएल निधी या लेखाशिर्षावर २३८ कोटी २१ लाखाची तरतुद करण्यात आली आहे. यामध्ये संचलन तुट १६५ कोटी ७१ लाख रूपये, विविध प्रकारचे पास २ कोटी ५० लाख, बस खरेदी ७० कोटी असा खर्च गृहित धरण्यात आला आहे. या रकमेतून १२ कोटी रूपये सन २०२०-२१ च्या अंदाजित संचलन तुटीचे लेखापरी क्षण होऊन तुट कायम होईपर्यंत मे २०२१ मध्ये द्यायचे आहेत. ही बाब आर्थिक स्वरूपाची असल्याने हा विषय महापालिका स्थायी समिती सभेपुढे ठेवण्यात येणार आहे.