रासायनिक पाणी प्यायल्याने बारा मेंढ्यांचा मृत्यू ;  कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील धक्कादायक प्रकार

पाटस : कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील उघड्यावर व रस्त्याच्या बाजूला साचलेले विषारी रासायनिक पाणी पिऊन बारा पेक्षा अधिक मेंढ्या मृत्युमुखी पडल्या असून वीस बकऱ्यांना विषबाधा झाली अाहे. बुधवार (ता. २८) ही घटना घडली.

दौंड तालुक्यातील पाटस गावातील मोटेवाडा येथील धनगर समाजाच्या एका कुटुंबातील हजार मेंढ्या घेऊन कुरकुंभ मार्गे नाशिकच्या दिशेने चालले होते. पुुणे-सोलापूर महामार्गावर वाहनांची संख्या जास्त असल्याने मेंढपाळ एक हजार बकऱ्यांचा कळप पर्यायी औद्योगिक वसाहतीच्या रस्त्याने मार्गस्थ करत होते. यावेळी औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यालगत मोठया प्रमाणात कंपन्यांचे विषारी रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडले होते. हे पाणी पिल्यानंतर सायंकाळच्या सुमारास बकऱ्या जागेवरच मरून पडू लागल्या तर काही बकऱ्यांना विषबाधा झाल्याने जागेवर बसल्या. वीस बकऱ्यांचा मृत्यू झाला तर साठ पेक्षा अधिक बकऱ्यांना विषबाधा झाली असल्याचे मेंढपाळ रामा शिवा बरकडे व आबा बाबू बरकडे यांनी सांगितले. या घटनेत २ लाख ५० हजार रुपयांची नुकसान झाले अाहे. बरकडे कुटुंबाचा फिरता वाडा कुरकुंभ परिसरात असून ते दौंड मार्गे पुढे जाणार होते. घटनास्थळी कुरकुंभ पोलीस स्टेशनचे जमादार शिंदे व के. बी. चांदणे यांनी घटनास्थळी भेट दिली.