धक्कादायक ! वानराची शिकार करून मांस फस्त करणाऱ्या दोन जणांना अटक

नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील वनपरिक्षेत्रामधील धालेवाडी तर्फे मिनेर येथे शिकारी कुत्र्याच्या मदतीने वानराची शिकार करून त्याचे मांस फस्त करणाऱ्या दोन जणांवर जुन्नर वन विभागाने गुन्हा दाखल केला

नारायणगाव :  जुन्नर तालुक्यातील वनपरिक्षेत्रामधील धालेवाडी तर्फे मिनेर येथे शिकारी कुत्र्याच्या मदतीने वानराची शिकार करून त्याचे मांस फस्त करणाऱ्या दोन जणांवर जुन्नर वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे .या दोघांना जुन्नर न्यायालयात हजर केले असता दि २४ जून पर्यंत न्यायालयीन कोठडी आली आहे.अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी दिली .

एकनाथ गोपाळ आसवले वय २९ रा फुलवडे ता आंबेगाव जिल्हा पुणे , गणपत शिमगे हिलम  वय ४० रा धालेवाडी तर्फे मिन्हेर तालुका जुन्नर यांच्यासह ७ जणांवर भारतीय वन्यजीव १९७२ चे कलम ९व ५१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार एक महिन्यापुर्वी एकनाथ आसवले  ,गणपत हिलम  व त्यांचे सहकारी यांनी धालेवाडी तर्फे मिन्हेर या गावातीळ मीना नदीच्या तीरावर एक कातकरी वस्ती आहे. येथील ७ जणांनी एका झाडावर वानर दिसले असता त्याचा पाठलाग करून गलोलच्या  साहाय्याने वानराला जखमी करून झाडावरून खाली पाडले . व शिकारी कुत्रांच्या मदतीने त्याला ठार मारून त्याचे मांस काढून  खाऊन टाकले . हि माहिती वन विभागाला मिळाली असता हे ७ जण फरारी झाली होते . त्यानंतर काल दि ११ जूनला या ७ जणांपैकी एकनाथ आसवले  ,गणपत हिलम हे धालेवाडी मिन्हेर येथे वस्तीवर आले असल्याची माहिती वन विभागाला कळताच वनविभागाच्या पथकाने या दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करून जुन्नर न्यायालयात हजर केले .हि कारवाई मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, जुन्नर विभागाचे उपवनसंरक्षक जयरामे गौडा ,सहाय्यक वनसंरक्षक डी वाय भुर्के  यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. व इतर ५ सहकाऱ्यांचा तपास वन विभाग जुन्नर हे करीत आहेत .