शिक्रापूर: पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथे कंपनीच्या ठेक्याच्या झालेल्या वादातून एका युवकावर तलवारीने हल्ला करणाऱ्या सरपंचांची मुले असणाऱ्या दोघा भावांना शिक्रापूर पोलिसांनी अटक करून शिरूर न्यायालयात हजर केले असतान न्यायालयाने दोघांना न्यायलयीन कोठडी सुनावली असल्याने तलवारीने हल्ला करणाऱ्या दोघांची रवानगी येरवडा कारागृहात केल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

पिंपळे जगताप (ता. शिरूर) गावच्या सरपंचांचा मुलगा महेश जगताप व गावातील पवन जगताप यांच्यामध्ये कंपनीच्या ठेक्यातून वाद झालेला असताना रात्रीच्या सुमारास स्कोर्पिओ गाडीतून महेश जगताप, विवेक जगताप, सचिन कुसेकर व प्रतिक शितोळे हे चौघेजण तलवार, काठ्या घेऊन आले व पवन जगताप याला मारहाण करू लागले त्यावेळी तेथे असलेला संदीप जगताप हा भांडणे सोडविण्यासाठी गेला असता महेश जगताप व विवेक जगताप या दोघांनी शिवीगाळ करत मारण्याची धमकी देत महेश जगताप याने तलवारीने संदीपच्या डोक्यात वार केला आणि विवेक याने काठीने मारहाण केली या मारहाणीमध्ये संदीप जगताप हा गंभीर जखमी झाला, याबाबत संदीप नानासाहेब जगताप रा. पिंपळे जगताप ता. शिरूर जि पुणे याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी पिंपळे जगताप ता. शिरूर गावच्या सरपंचांची दोन मुले महेश विजय जगताप, विवेक विजय जगताप, प्रतिक कैलास शितोळे व सचिन सुपेकर सर्व रा. पिंपळे जगताप ता. शिरूर जि. पुणे यांच्यावर गुन्हे दाखल केले होते यांनतर चौघे देखील फरार झालेले असताना आज अखेर शिक्रापूर पोलिसांनी महेश विजय जगताप व विवेक विजय जगताप या दोघा सख्या भावांना अटक केली तर अन्य दोघांचा शोध शिक्रापूर पोलीस घेत आहे, अटक करण्यात आलेल्या दोघांना आज शिरूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने महेश व विजय या दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याने दोघांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर व पोलीस हवालदार प्रशांत गायकवाड हे करत आहे.

– औद्योगिक वसाहतीतील गुन्हेगारांवर तडीपारीचे प्रस्ताव:मयूर वैरागकर
शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये औद्योगिक वसाहतीतील कंपनीच्या कामांच्या ठेक्याची स्पर्धा सुरु झालेली असून त्यामुळे अनेक लहान मोठे गुन्हे घडत आहे, सदर गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी औद्योगिक वसाहतीतील गुन्हेगारांवर तडीपारीचे प्रस्ताव तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर यांनी सांगितले.