तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणारे २ जणांना अटक, १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव मंदार राजेंद्र ठोसर (३२) मनोज सुमतीलाल दुगड (३५) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथक पश्चिम गुन्हे शाखा पुणे हे हडपसर भागात गस्त घालत होते.

पुणे : खंडणी व आम्लपदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. आम्लपदार्थ विरोधी पथकाने पुण्यातील फुरसुंगीजवळ एक टेम्पो पकडला असून तंबाखू, गुटख्याच्या १० लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. (transporting tobacco products) या घटनेत २ जणांना अटक करण्यात आली आहे. (Two arrested ) हे दोघे आरोपींनी वाहनाला अत्यावश्यक सेवेचा बोर्ड लावून वाहतूक करत होते.

अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव मंदार राजेंद्र ठोसर (३२) मनोज सुमतीलाल दुगड (३५) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथक पश्चिम गुन्हे शाखा पुणे हे हडपसर भागात गस्त घालत होते. त्यावेळी आरोपी मंदार व मनोज भेकराईनगर, फुरसुंगी येथे पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थ घेऊन आल्याची माहिती मिळाली.

यामुळे आरोपींच्या टेम्पोची झाडाझडती घेण्यात आली. तेव्हा सदर टेम्पोमध्ये विमल पान मसाला, व्ही १ सारखे तंबाखूजन्य पदार्थ आढळले. एकूण १२ लाख १४ हजार ५२९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.