सराईत गुन्हेगारासह दोघे जेरबंद, दोन पिस्तुल ; चार काडतुसे जप्त

खंडणी विरोधी पथकाचे कर्मचारी फरार व तडीपार आरोपींबाबत माहिती घेत देहूरोड हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी गुन्हेगार राम पाटील हा माळवाडी - देहूगाव येथे थांबला असून त्याच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती निशांत काळे व गणेश गिरीगोसावी यांना मिळाली. त्यानुसार, पाटील याला ताब्यात घेत ४० हजार ४०० रुपये किंमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले.

    पिंपरी- देहूगावात सराईत गुन्हेगारासह दोघांना जेरबंद करण्यात आले. खंडणी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत त्यांच्याकडून ८० हजार ८०० रुपये किंमतीचे दोन पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

    राम परशुराम पाटील (वय २७, रा. जय मल्हारनगर, थेरगाव), राजू बसवराज माने (वय २८, रा. यशोदिप चौक, वारजे – माळेवाडी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपी राम पाटील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वाकड, देहूरोड, खडकी पोलीस ठाण्यात दरोडा, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

    खंडणी विरोधी पथकाचे कर्मचारी फरार व तडीपार आरोपींबाबत माहिती घेत देहूरोड हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी गुन्हेगार राम पाटील हा माळवाडी – देहूगाव येथे थांबला असून त्याच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती निशांत काळे व गणेश गिरीगोसावी यांना मिळाली. त्यानुसार, पाटील याला ताब्यात घेत ४० हजार ४०० रुपये किंमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले.

    हे पिस्तुल व काडतुसे राजू माने याच्याकडून घेतल्याचे सांगितल्याने राजू बसवराज माने याला सापळा रचून वारजे – माळेवाडी येथे जेरबंद करण्यात आले. त्याच्याकडून ४० हजार ४०० रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, फौजदार महेंद्र पाटील, सुनिल कानगुडे, प्रदीप गोडांबे, शैलेश मगर, अशोक गारगोटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.