प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दिलेल्या माहितीनुसार,रविवारी रात्री पावणे एक वाजता पुणे मुंबई महामार्गालगत असलेल्या एका हॉटेल जवळ दोन तरुण संशयास्पदरित्या उभे असलेले दिसले. त्यांच्याकडे चौकशी केली असता दुचाकीवरून आरोपी पळू जाऊ लागले.

वडगाव मावळ : विनापरवाना गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही कारवाई रविवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास जुना पुणे मुंबई महामार्गावर जांभूळ फाटा येथे करण्यात आली.

रोहित संजय आंद्रे ( वय २० रा. कुसगाव तालुका मावळ जिल्हा पुणे ) व वरूण वहिले ( वय १९ रा. लम्बोदर चौक  ढोरेवाडा वडगाव )अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलीस शिपाई दिलीप गंगाराम सुपे यांनी वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दिलेल्या माहितीनुसार,रविवारी रात्री पावणे एक वाजता पुणे मुंबई महामार्गालगत असलेल्या एका हॉटेल जवळ दोन तरुण संशयास्पदरित्या उभे असलेले दिसले. त्यांच्याकडे चौकशी केली असता दुचाकीवरून आरोपी पळू जाऊ लागले.

पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे असा ४०२०० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळाला. नंतर त्यांना अटक करण्यात आली आहे़. याप्रकरणी अधिक तपास वडगाव मावळ पोलीस करीत आहेत.