सणसरमध्ये दोन विचित्र अपघात, चार जणांचा बळी, ठेकेदारावर कारवाईची मागणी

रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने साईड पट्ट्या न भरल्याने साखरेच्या पोत्याचा ट्रक रोडवरून घसरला. छत्रपती कारखान्याचा एक ट्रक साखरेची पोती घेऊन जात असताना जाचकवस्तीजवळ हा अपघात झाला.

    सणसर : सणसर परिसरात दोन विचित्र अपघातात काल (दि.१५)चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने साईड पट्ट्या न भरल्याने साखरेच्या पोत्याचा ट्रक रोडवरून घसरला. छत्रपती कारखान्याचा एक ट्रक साखरेची पोती घेऊन जात असताना जाचकवस्तीजवळ हा अपघात झाला.

    बाजूला असलेल्या तीन महिला या ट्रकखाली सापडल्या. यावेळी गावातील नागरिक मदतीसाठी पुढे झाले. यावेळी उपसरपंच प्रकाश नेवसे यांनी याबाबत सर्वांना माहिती दिली. यानंतर वालचंदनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सणसरमधील युवकांनी तातडीने मदत केली.

    यामध्ये दोन महिला गुदमरून गेल्या त्यांचा मृत्यू झाला. माहितीनुसार प्रतीक्षा विशाल पाथरे, कविता बाबासाहेब गायकवाड या दोन महिलांचा यामध्ये मृत्यू झाला. दरम्यान दुपारी ट्रॅक्टरखाली सापडून दुचाकीवरील दोन जण ठार झाले. यामध्ये प्रदीप फडतडे व मीराबाई अष्टेकर या दोघांचा यामध्ये समावेश आहे.

    केवळ रोडची साईडपट्टी न भरल्याने हे अपघात झाले असल्याचे अनेकांनी यावेळी सांगितले. यामुळे ठेकेदारावर कारवाईची मागणी केली जात आहे.