आंबेगाव तालुक्यात आढळले दोन कोरोनाबाधित

रूग्ण संख्या गेली २७ वर, एकास घरी सोडले

रूग्ण संख्या गेली २७ वर, एकास घरी सोडले                                                                                                                                                                                                                                 

भिमाशंकर: आंबेगाव तालुक्यात (दि.३०) रोजी गिरवली व वळती या दोन गावांत दोन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडल्याने रूग्णांची संख्या २७ झाली असून त्यापैकी १ जण बरा होऊन घरी सोडण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी जालींदर पठारे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली.

-नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

साकोरे, शिनोली, निरगुडसर, जवळे, पिंपळवाडी (लांडेवाडी), वडगाव काषिंबेग, गिरवली, वळती, फदालेवाडी, पेठ, एकलहरे या अकरा गावांमध्ये कोरोना बाधित रूग्ण आढळून आले. या रूग्णांच्या संपर्कात असलेले गिरवली येथील २३ वर्षीय पुरूष व वळती (गांजवेवाडी) येथील ४२ वर्षीय महिला पॉझिटीव्ह व्यक्ति सापडल्या आहेत. भीमाशंकर हॉस्पिटल मंचर येथे यांच्यावर उपचार चालू आहे. (दि.२८) रोजी रूग्णांच्या संपर्कात असलेल्या ३३ व्यक्तिंची तपासणी रिपोर्ट पाठविण्यात आला. यामध्ये (दि.३०) रोजी यातील ३१ निगेटीव्ह व्यक्ति निघाल्या तर दोन व्यक्तिंचा पॉझिटीव्ह रिपोर्ट आला. आता तालुक्यातील कोरोना बाधित व्यक्ति संख्या २७ झाली असुन त्यापैकी एक जण बरा होऊन घरी सोडण्यात आला आहे. दि. २९ रोजी पंधरा कोरोना पॉझिटीव्ह सापडलेल्या रूग्णंापैकी बारा रूग्ण भीमाशंकर हॉस्पिटल मंचर येथे उपचार चालू असून तीन व्यक्तिंना पुणे येथे उपचारासाठी पाठवले आहे. तालुक्याच्या विविध गावांमध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधित व्यक्तिंची संख्या वाढत चालली असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

मुंबई, पुणे व इतर गावांवरून येणाऱ्या नागरिकांनी काळजी घेत स्वतः क्वॉरंटाईन व्हावे. प्रशासनाला माहिती दयावी गर्दीमध्ये जाण्याचे टाळावे लक्षणे दिसल्यास तात्काळ दवाखान्यात उपचारासाठी जावे, असे आवाहन गटविकास अधिकारी जालींदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी केले.