पुण्यात पावणे दोन कोटींची घरफोडी…! घरफोडीच्या घटनांनी पुणेकर हैराण ; वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव

चोरघडे हे हडपसर भागात राहण्यास आहेत. दरम्यान ते शेतकरी असून, पीडिजात त्यांचा शेती व्यवसाय आहे. ते बागायतदार आहेत. त्यांचा आकाश लॉन्स परिसरात बंगला आहे. काही कामानिमित्त ते बंगल्याला कुलूप लावून गेले होते.

    पुणे : पुण्यात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी एक बंद बंगला फोडून तबल दीडशे तोळ्याहून अधिक सोने चांदी व परदेशी चलन असा पावणे कोटींची ऐवज चोरून नेला. लाखावरून चोरट्यांनी कोट्यवधी रुपयांची घरफोडी केल्याने शहरासह पोलीस दलात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्थानिक पोलिसांनी धाव घेतली आहे.

    याप्रकरणी विवेक चोरघडे यांच्या घर फोडण्यात आले आहे. याप्रकरणी पंचनामा सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, चोरघडे हे हडपसर भागात राहण्यास आहेत. दरम्यान ते शेतकरी असून, पीडिजात त्यांचा शेती व्यवसाय आहे. ते बागायतदार आहेत. त्यांचा आकाश लॉन्स परिसरात बंगला आहे. काही कामानिमित्त ते बंगल्याला कुलूप लावून गेले होते.

    दरम्यान आज चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच घरात ठेवलेले सोन्याचे दागिने, चांदी, परदेशी चलन आणि इतर ऐवज असा दीड ते पावणे दोन कोटी रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

    पुण्यात घरफोडीचे प्रकार रोज सुरू आहेत. लाखांची घरफोडी होत आहेत. पण आज चोरट्यांनी कोटींची घरफोडी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी येथे धाव घेऊन पाहणी सुरू केली आहे.