दोन दिवसांनंतर पुण्यात आजपासून लसीकरणास सुरुवात

दोन दिवस लसीकरण बंद असल्याने लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने पुणे महापालिकेने नागरिकांची होणारी गर्दी आणि होणार गोंधळ टाळण्यासाठी आधीच नियोजन केले आहे.

  पुणे : कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याने शुक्रवारी आणि शनिवारी पुणे महापालिकेचे सर्व लसीकरण केंद्रे बंद होती. खासगी रुग्णालये थेट सीरम कंपनी कडून लस खरेदी करत असलेल्या खासगी रुग्णालयात शनिवारी पासून लसीकरण सुरू झाले आहे. महापालिकेला राज्य सरकारकडून कोव्हिशिलड लसीचे १३ हजार डोस उपलब्ध झाले असून आज पुण्यातील ७० केंद्रांवर ४५ वयाच्या पुढील नागरिकांचे लसीकरण केले जाईल. दोन दिवस लसीकरण बंद असल्याने लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने पुणे महापालिकेने नागरिकांची होणारी गर्दी आणि होणार गोंधळ टाळण्यासाठी आधीच नियोजन केले आहे.

  असे असले महापालिकेचे नियोजन

  -ऑनलाईन बुकींग करून पहिला डोस घेणाऱ्या ४५ वयाच्या पुढील नागरिकांसाठी ६० टक्के लस ही राखीव ठेवण्यात आले आहे.

  -सकाळी ८ वाजता नागरिकांना ऑनलाईन बुकींग करता येईल.

  -ऑफलाईन पध्दतीने म्हणजे थेट लसीकरण केंद्रांवर जाऊन लस घेणाऱ्यांसाठी पहिल्यां डोस साठी २० टक्के लस राखीव ठेवण्यात आली आहे.

  -ज्या नागरिकांचा पहिला डोस घेऊन ८५ दिवस झाले आहेत अशा ४५ वयाच्या पुढील नागरिकांसाठी २० टक्के लस ही राखीव असेल.