नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

सकाळी भीमा नदी पात्रात आंघोळीसाठी गेले होते. नदीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते दोघे जण बुडाले. यावेळी नागरिकांनी या दोघांना वाचविण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, हे प्रयत्न अयशस्वी झाले.

    दौंड / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : दौंड येथील भीमा नदी (Bhima River) पात्रात शनिवारी (दि. १८) सकाळी साडे अकराच्या सुमारास नदीवर आंघोळ करण्यासाठी गेलेल्या काका-पुतण्याचा पाण्यात बुडून मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

    याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पानसरे वस्ती येथील आवेश मुजफ्फर शेख (वय १३) व आदिल मेहबूब शेख (वय १८) हे दोघेही शनिवारी (दि. १८) सकाळी भीमा नदी पात्रात आंघोळीसाठी गेले होते. नदीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते दोघे जण बुडाले. यावेळी नागरिकांनी या दोघांना वाचविण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, हे प्रयत्न अयशस्वी झाले.

    या दोघांचाही मृतदेह साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. यावेळी नागरिकांनी नदी किनारी प्रचंड गर्दी केली होती. पोलीस निरीक्षक विनोद घुगे, पोलीस हवालदार सचिन बोराडे, पोलीस हवालदार अण्णा देशमुख, सहाय्यक फौजदार भाकरे यांनी नदीकाठी जमलेल्या नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले. काका-पुतण्याच्या या मृत्यूमुळे दौंड परिसरात शोककळा पसरली आहे.