इंद्रायणी नदीत दोन मित्र बुडाले; एकाचा मृत्यू

अनिमेश व्होटकर आणि त्याचा मित्र रोहित वाल्मिकी हे दोघे इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी उतरले. एका काठावरून नदीच्या दुसऱ्या काठाकडे पोहत जात असताना पात्राच्या मध्यभागी दमछाक झाल्याने अमिनेशचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. लोणावळा येथील शिवदुर्ग रेस्क्यू टीम, वन्यजीव रक्षक संस्था, मावळ यांच्या सदस्यांनी शोध मोहीम राबवली. सुमारे दीड तासाच्या शोध मोहिमेनंतर अनिमेशचा मृतदेह शोधण्यात यश आले.

    पिंपरी: इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांपैकी एकाचा दमछाक झाल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये अनिमेश शांताराम व्होटकर (वय २०, रा. समता कॉलनी, वराळे) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. या संदर्भात रोहित नरेश वाल्मिकी(वय २९, रा. समता कॉलनी, वराळे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे.

    अनिमेश व्होटकर आणि त्याचा मित्र रोहित वाल्मिकी हे दोघे इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी उतरले. एका काठावरून नदीच्या दुसऱ्या काठाकडे पोहत जात असताना पात्राच्या मध्यभागी दमछाक झाल्याने अमिनेशचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. लोणावळा येथील शिवदुर्ग रेस्क्यू टीम, वन्यजीव रक्षक संस्था, मावळ यांच्या सदस्यांनी शोध मोहीम राबवली. सुमारे दीड तासाच्या शोध मोहिमेनंतर अनिमेशचा मृतदेह शोधण्यात यश आले. घटनेचे वृत्त समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे आणि सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.