शिक्रापुरात मुंबईहून आलेल्या दोघांना कोरोनाची लागण

शिक्रापूर : देशभरात कोरोना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातलेले असताना आणि त्यामुळे संपूर्ण राज्य हादरून गेलेले आहे, यापूर्वी शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, सणसवाडी, विठ्ठलवाडी, तळेगाव ढमढेरे येथे काही इसमांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते तर शिरूर तालुक्यातील तिघांचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली असताना आता शिक्रापूर येथे मुंबई हून आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असल्याने शिरूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून आता पुन्हा शिरूर तालुका हादरून गेला आहे.

 शिक्रापूर : देशभरात कोरोना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातलेले असताना आणि त्यामुळे संपूर्ण राज्य हादरून गेलेले आहे, यापूर्वी शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, सणसवाडी, विठ्ठलवाडी, तळेगाव ढमढेरे येथे काही इसमांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते तर शिरूर तालुक्यातील तिघांचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली असताना आता शिक्रापूर येथे मुंबई हून आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असल्याने शिरूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून आता पुन्हा शिरूर तालुका हादरून गेला आहे.

                          शिक्रापूर ता. शिरूर येथील कामानिमित्ताने घाटकोपर मुंबई येथे राहणारे कुटंब शिक्रापूर राऊतवाडी येथे आले होते, यावेळी सध्या कुटुंबियांना सोडून त्यांच्या घरातील एक इसम २० मे रोजी कुटुंबियांना सोडून पुन्हा मुंबई येथे गेला होता, त्यांनतर दोन दिवसांनी पुन्हा शिक्रापूर येथे आला, त्यांनतर सदर कुटुंबातील एका व्यक्तीला काही त्रास होऊ लागल्याने त्यांनी २४ मे रोजी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय गाठले तेथून त्यांना ससून रुग्णालयात पाठविण्यात आले, नंतर ससून रुग्णालयातून त्यांना पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, दरम्यानच्या काळामध्ये कुटुंबियांना शिक्रापूर येथे सोडून मुंबईला गेलेला त्यांच्या कुटुंबातील एक इसम पुन्हा शिक्रापूर येथे आला त्याला देखील त्रास जाणवू लागल्याने त्याने स्वतः रुग्णालयात दाखल होऊन तपासणी केली तसेच पुणे येथे दाखल झालेल्या एका व्यक्तीची देखील तपासणी केली असता त्या दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्यांनतर संपूर्ण शिक्रापूर व परिसरात खळबळ उडाली असून शिरूर तालुका हादरून गेला आहे, याबाबत माहिती प्राप्त होताच शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे, आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे, पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, ग्रामविकास अधिकारी बि. बि. गोरे आदींनी सदर इसम राहत असलेल्या परिसरात भेट देऊन शिक्रापूर राऊतवाडी परिसरात शिक्रापूर ग्रामपंचायतच्या माध्यमातून फवारणी सुरु केली असून सदर युवकाच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींची माहिती काढण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे.
इसमाच्या कुटुंबातील पाच जणांची तपासणी – डॉ. राजेंद्र शिंदे ( तालुका वैद्यकीय अधिकारी )
शिक्रापूर ता. शिरूर येथील दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर योग्य ती खबरदारी घेत कोरोना बाधित इसमांच्या कुटुंबातील इतर पाच व्यक्तींना तपासणीसाठी पाठविले असून इतर माहिती घेतली जात असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी सांगितले.
 
ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला माहिती द्यावी – बि. बि. गोरे ( ग्रामविकास अधिकारी )
शिक्रापूर ता. शिरूर गावामध्ये पुणे, मुंबई येथून येणाऱ्या नागरिकांची माहिती ग्रामस्थांनी वेळीच ग्रामपंचायत कार्यालयात देणे गरजेचे असून त्यामुळे योग्य खबरदारी घेत पुढील उपाययोजना राबविता येऊ शकतात असे ग्रामविकास अधिकारी बि. बि. गोरे यांनी सांगितले.
नागरिकांनी व ग्रामस्थांनी सहकार्य करावे – सदाशिव शेलार.
शिक्रापूर परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असून नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे असून विनाकारण बाहेर फिरू नये तसेच बाहेर गावाहून येणाऱ्या नातेवाईकांची व्यवस्था विलानिकरण कक्षात करावी असे आवाहन पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी केले आहे.