आरणगावात शेताच्या रस्त्याच्या वादातून दोन गटात हाणामारी

शिक्रापूर : आरणगाव ता. शिरूर येथील दगडे वस्ती येथे जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोन्ही गटांच्या नऊ जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आली असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

                                आरणगाव ता. शिरूर येथील इंदुबाई दगडे व छाया दगडे यांच्यामध्ये जमिनीच्या रस्त्याचा वाद आहे, त्या दोन्ही गटांमध्ये रस्त्याच्या वादातून मोठा वाद झाला आणि दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली आहे, याबाबत इंदूबाई भागुजी दगडे रा. आरणगाव दगडे वस्ती ता. शिरूर जि. पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी भाऊसाहेब बाळासाहेब दगडे, बाळासाहेब दिनकर दगडे, दिनकर मुकिंदा दगडे, गणेश बाळासाहेब दगडे, छाया बाळासाहेब दगडे, कविता बाळासाहेब दगडे सर्व रा. आरणगाव दगडे वस्ती ता. शिरूर जि. पुणे तर छाया बाळू दगडे रा. आरणगाव दगडे वस्ती ता. शिरूर जि. पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी विनायक भागुजी दगडे, भागुजी दगडे, इंदूबाई भागुजी दगडे सर्व रा. आरणगाव दगडे वस्ती ता. शिरूर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश डुकले व रविकिरण जाधव हे करत आहे.