प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

लोणी काळभोर : लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील पाषाणकर बाग येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी (१२) संध्याकाळी साडेआकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे दोन्ही गटांनी दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी दोन्ही गटातील तब्बल बावीस जनांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लोणी काळभोर : लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील पाषाणकर बाग येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी (१२) संध्याकाळी साडेआकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे दोन्ही गटांनी दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी दोन्ही गटातील तब्बल बावीस जनांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर गटाच्या शुभम तात्यासाहेब काळभोर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अष्टविनायक पॅनेलचे प्रमुख प्रशांत दत्तात्रय काळभोर, राज उर्फ विशाल प्रताप काळभोर, गुरूदेव दत्तात्रय काळभोर, सौरभ दयानंद काळभोर, शुभम विलास काळभोर, निखील धोंडीबा काळभोर, वैभव आनंदा काळभोर, रोहीत गिरी, निलेश धोंडीबा काळभोर, शुभम प्रदिप क्षीरसागर व सिध्देश्वर प्रदिप क्षीरसागर या अकरा जनांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर प्रशांत काळभोर गटाच्या सौरभ दयानंद काळभोर यांनीदिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांच्यासह युवराज रामचंद्र काळभोर, गणेश सुखदेव काळभोर, नितिन ज्ञानोबा काळभोर, आदित्य तुपे, किशोर मदणे, सीताराम लांडगे, सुभाष काळभोर, प्रवीण राजाराम काळभोर, अमित माणिक काळभोर, शुभम तात्यासाहेब काळभोर या अकरा जनांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या सतरा सदस्यांसाठी पंचवार्षिक निवडणुक येत्या शुक्रवारी (ता.१५ ) होणार आहे. या निवडणुकीसाठी यशवंत सहकारी साखऱ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, माजी जिल्हा परीषद सदस्य विलास काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर व हवेली तालुका कॉग्रेसचे (आय) चे माजी अध्यक्ष शिवदास काळभोर यांच्या नेतृत्वाखालील परीवर्तन पॅनेल व शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत काळभोर व लोणी काळभोरचे माजी सरपंच शऱद काळभोर यांच्या नेतृत्वाखालील अष्टविनायक पॅनेल या दोन पॅनेलमध्ये सरळ लढत आहे. यातुनच मंगळवारी लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील पाषानकर बागेत भांडणाचा भडका उडाला. महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांचे पाषानकर बागेत जनसंपर्क कार्यालय असुन, या कार्यालयावर प्रशांत काळभोर यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याने, वरील प्रकार झाल्याचा आरोप राहुल काळभोर गटाने केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी दोन्ही गटातील तब्बल बावीस जनांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हानामारीचे सिसीटिव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलेले आहे. यामुळे भांडणे नेमकी कोणी सुरु केली याचा तपास चालु आहे. तसेच हानामारीचे सिसीटिव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलेले आहे. यामुळे भांडणे नेमकी कोणी सुरु केली याचा तपास चालु आहे. गावात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असल्याचे लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूरज बंडगर करीत आहेत .