कुरकुंभ घाटात ट्रकची दुचाकीला भीषण धडक ; इंदापुर तालु्क्यातील दोघे जण ठार

पुणे-सोलापूर महामार्गावरून पाटस बाजुकडून कुरकुंभ बाजुला प्रवास करीत असलेली दुचाकी ( क्रमांक एम एच,यु. १३, - ९७१४) ही जात असताना समोरून विरूध दिशेने येणारी हायवा टिपर ट्रक ( क्रमांक .एम. एच ४२ ए.क्यु. १८५२ ) या ट्रक वाहतुकीचे नियमांचे उल्लंगन करीत महामार्गाच्या विरूध्द दिशेन जावून दुचाकी जोरदार धडक दिली.

    पाटस : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस घाटात हायवा ट्रक ने दुचाकीस धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात इंदापूर तालुक्यातील दोघे जण जागीच ठार झाले. नवनाथ दगडू जाधव (वय ३४ रा. निरनिमगाव.ता.इंदापुर ) व तात्याराम जगन्नाथ राऊत (वय ३४. रा, लाखेवाडी ता. इंदापूर ) असे या अपघातात मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. हे दोघे ही मित्र आहेत.ते कामानिमित्त पाटसला आले होते. काम उरकून पाटसहून इंदापुरला जात असताना आज शुक्रवारी ( दि.१९) दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास पाटस – कुरकुंभ घाटात हॅाटेल कांदबरी जवळ हा अपघात झाला.

    याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे-सोलापूर महामार्गावरून पाटस बाजुकडून कुरकुंभ बाजुला प्रवास करीत असलेली दुचाकी ( क्रमांक एम एच,यु. १३, – ९७१४) ही जात असताना समोरून विरूध  दिशेने येणारी हायवा टिपर ट्रक ( क्रमांक .एम. एच ४२ ए.क्यु. १८५२ ) या ट्रक वाहतुकीचे नियमांचे उल्लंगन करीत महामार्गाच्या विरूध्द दिशेन जावून दुचाकी जोरदार धडक दिली. हायवा ट्रक चालक हा अपघात करून ट्रक तेथेच ठेवून पसार झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी अवस्थेत महामार्गावरील रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडले होते.

    घटनेची माहिती मिळताच पाटस पोलीस चौकीचे पोलीस हवालदार बाळासाहेब पानसरे,प्रदिप काळे,सागर चव्हाण, विजय भापकर, पोलीस मित्र सोनबा देशमुख यांनी धाव घेतली. पाटस टोल नाक्यावरील रूग्णवाहीकेस पाचारण करून या अपघातातील
    दुचाकीवरील दोघांनी खासगी रूग्णालायात दाखल केले असता. उपचारापुर्वीच मृत्यु झाल्याचे डॅाक्टर यांनी सांगितले. दरम्यान. याबाबत अमित अरूण पवार (रा. मोरेवस्ती दौंड ) यांनी पाटस पोलीस चौकीत फिर्याद दिल्याने पोलीसांनी हायवा ट्रक चालकाविरूध्दा अपघातास कारणीभुत ठरल्याने गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती पोलीसांनी दिली.