सुला लावणार दोन लाख झाडे

नाशिक, दिंडोरी व इतर भागात झाडे लावणार
पुणे :भारतातील आघाडीच्या वाईन उत्पादक असलेल्या सुला विनयार्ड्सने सावरगाव जवळ वासळी पर्वतीय वनक्षेत्रात नुकतेच १२,००० पेक्षा जास्त रोपे लावून ग्लोबल वार्मिंग आणि जंगलतोडीचा परिणाम कमी करण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अ‍ॅक्टिव्हिटी अंतर्गत येत्या काही वर्षांत २ लाखाहून अधिक झाडे लावण्याच्या या कंपनीच्या मोहिमेचा हा एक भाग होता. गेल्या अनेक वर्षात कंपनीने नाशिक, दिंडोरी व इतर भागात ४०,००० पेक्षा जास्त झाडे लावली आहेत.

या रोपांमध्ये कारंजा, जांभूळ, आपटा, पिंपळ इत्यादी मूळ प्रजातींचा समावेश आहे. मूळ प्रजाती जैवविविधता आणि आपल्या नैसर्गिक वारशास प्रोत्साहन देतात. सुलाने केवळ रोपेच लावली नाहीत तर खड्डे खोदणे, संपूर्ण क्षेत्राचे कुंपण घालणे आणि झाडे जोम धरे पर्यंत तीन वर्षांची सुरक्षा याची जबाबदारी स्वेच्छेने स्वीकारली आहे. सर्व सामाजिक अंतर नियम आणि सुरक्षा प्रोटोकॉल यांचे अनुसरण करून वृक्षारोपण करण्यात आले.सामंत यांच्यासह उप वनसंरक्षक, नाशिक (पश्चिम) शिवाजी फुले यांनी वृक्षारोपण मोहिमेस हजेरी लावली. त्यांच्याव्यतिरिक्त सुला विनयार्डसचे ज्येष्ठ उपाध्यक्ष संजीव पैठणकर, ज्येष्ठ उपाध्यक्ष मोनित ढवळे आणि सहयोगी उपाध्यक्ष त्रंबक ओतूरकर हे नाशिकमधील सुला कर्मचार्‍यांसमवेत रोपे लावण्याच्या मोहिमेस उपस्थित होते.

-पर्यावरणाविषयीची जबाबदारी लक्षात घ्यायला हवी
सौर ऊर्जेचा वापर, पाणी साठवण आणि समुदाय सेवा यासारख्या टिकाव पद्धती, भारताच्या अत्यंत प्रिय वाइन ब्रँडच्या केंद्रस्थानी आहेत. “आम्ही भविष्य लक्षात ठेवून वाइन बनवण्यावर विश्वास ठेवतो. व्यवसायांनी पर्यावरणाविषयीची जबाबदारी लक्षात घ्यायला हवी आणि आम्ही आपल्या पद्धतींचा संपूर्ण उपयोग करतो. हवामान बदलाचा परिणाम प्रत्येकावर होत असून त्वरित कृती करण्याची मागणी केली जाते. हिरव्यागार भविष्याकडे वळण्याच्या आमच्या प्रवासात वृक्ष लागवड, सौर ऊर्जा आणि पाण्याचा कमी वापर इत्यादींचा समावेश असेल, ” सुला विनयार्डसचे संस्थापक राजीव सामंत म्हणाले. सुला विनयार्ड्सने शहरातील केवळ हरितक्षेत्रच वाढवले नाही तर वाइनरी आणि त्यातील रिसॉर्ट्समध्ये हजारो लोकांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करुन नाशिकमध्ये सक्रिय भूमिका बजावली आहे.