भोरमध्ये आणखी दोन रूग्ण

रायरीमधील रूग्णांची संख्या झाली पांच. भोर : तालुक्यातील रायरी व बाजारवाडी येथे दोन नवीन करोना बाधीत रूग्ण सोमवारी सायंकाळी आढळले आले असून त्यांच्यावर पुणे येथील रूग्णालयांत उपचार सुरू असल्याचे

रायरीमधील रूग्णांची संख्या झाली पांच.

भोर : तालुक्यातील रायरी व बाजारवाडी येथे दोन नवीन करोना बाधीत रूग्ण

सोमवारी सायंकाळी आढळले आले असून त्यांच्यावर पुणे येथील रूग्णालयांत उपचार सुरू

असल्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी सांगितले.त्यामुळे रायरीतील एकूण

बाधीतांची संख्या पांच झाली आहे.बाजारवाडीच्या मानकर वस्तीमधील तरूण कांही दिवसापूर्वी

मुंबईवरून आला होता.तर रायरीच्या रणुसेवाडीतील तरूण हा रायरीच्या कुंटुबासमवेत होता.

तालुक्यातील एकूण रूग्णांची संख्या दहा झाली असून चौघांनी करोनावर मात केली आहे.

रायरीतील इतर चौघांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे तालुका वैदयकीय तालुका वैदयकीय

अधिकारी डॉ.सुनिल क-हाळे यांनी सांगितले. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून बाजारवाडीचा

परीसर सील केला आहे.

……………………………………………………………………………………………………….