वेल्हयात नवीन दोन रूग्ण

भोर : वेल्हे तालुक्यातील साखर येथे ज्येष्ठ महिला तर निगडे मोसे मध्ये एक बाळंतिण महिला सोमवारी नवीन करोनाबाधीत आढळले आहेत. त्यांच्यावर पुणे येथील रूग्णालयांत उपचार सुरू असल्याचे तहसीलदार शिवाजी शिन्दे

भोर : वेल्हे तालुक्यातील साखर येथे ज्येष्ठ महिला तर निगडे मोसे मध्ये एक बाळंतिण महिला सोमवारी नवीन करोनाबाधीत आढळले आहेत. त्यांच्यावर पुणे येथील रूग्णालयांत उपचार सुरू असल्याचे तहसीलदार शिवाजी शिन्दे यांनी सांगितले. तालुका करोनामुक्त झाला म्हणताच नवीन संकट प्रशासनासमोर उभे राहीले आहे. ज्येष्ठ महिलेला दमा, मधुमेह असे इतर आजार आहेत. बाळंतिण महीलेचा पति रिक्क्षा चालक असून ते पुण्यातून येजा करतो.या दोन्ही ठीकाणचा परीसर प्रशासनाने सील केला आहे. साखरमधील सात तर निगडेतील बारा जणांना तपासणीसाठी पुण्याला पाठवल्याचे तालुका वेदयकीय अधिकारी डॉ.अंबादास देवकर यांनी सांगितले. तालुक्यातील आतापर्यंत एकतीस रूग्णांनी करोनावर मात केली तर तर एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान भोर तालुक्यातील आकरा जणांचे तपासणी अहवाल आज निगेटिव्ह आल्याचे तालुका वेदयकीय अधिकारी डॉ.सुनिल क-हाळे यांनी सांगितले.