वेल्हयात कोरोनाचे नवीन दोन रूग्ण

भोर : वेल्हे तालुक्यातील साखर येथे सोमवारी एका ज्येष्ठ महिलेला तर निगडे मोसे मध्ये एक बाळंतीण महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. या दोघींवर पुणे येथील रूग्णालयांत उपचार सुरू

भोर : वेल्हे तालुक्यातील साखर येथे सोमवारी एका ज्येष्ठ महिलेला तर निगडे मोसे मध्ये एक बाळंतीण महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.  या दोघींवर     पुणे येथील रूग्णालयांत उपचार सुरू असल्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी सांगितले.तालुका कोरोनामुक्त झाला म्हणताच नवीन संकट प्रशासनासमोर उभे राहीले आहे. ज्येष्ठ महिलेला दमा,मधुमेह असे इतर आजार आहेत तर बाळंतीण महिलेचा पती  रिक्षाचालक असून ते पुण्यातून ये-जा करतो.या दोन्ही ठिकाणचा परिसर प्रशासनाने सील केला आहे.साखरमधील सात तर निगडेतील बारा जणांना तपासणीसाठीपुण्याला पाठवल्याचे तालुका वेदयकीय अधिकारी डॉ.अंबादास देवकर यांनी सांगितले.तालुक्यातील आतापर्यंत एकतीस रूग्णांनी कोरोनावर मात केली तर तर एकाचा मृत्यू झाला आहे.दरम्यान भोर तालुक्यातील अकरा जणांचे तपासणी अहवाल आज निगेटिव्ह आल्याचे तालुका वेदयकीय अधिकारी डॉ.सुनिल क-हाळे यांनी सांगितले.