ट्रकला कट मारण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

लोणी काळभोर : पनवेल येथे निघालेल्या टेक्निशियनने आपली दुचाकी महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडकू नये म्हणून कट मारण्याच्या प्रयत्नात दुचाकी गॅरेजचे शेडच्या लोखंडी खांबाला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेही जागीच मृत्युमुखी पडले असल्याची घटना मध्यरात्री लोणी काळभोर येथील माळीमळा येथे घडली आहे.

या अपघातात विनायक अंबरूषी मोरे ( वय ३७, रा. गणेगाव, ता भूम, जि उस्मानाबाद ) व त्यांचा मित्र ईश्वर व्यंकटराव मुंगळे ( वय २५, रा. हलगारा, ता. निलंगा, जि. लातूर दोघेही सध्या रा. युआरसी अपार्टमेंट, लोधीवली, दान फाटयाजवळ, रसायणी, पनवेल, जि. रायगड ) हे दोघे मृत्युमुखी पडले आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे हे सध्या सिप्ला कंपनी नवी मुंबई येथे अनव्हेंटिया हेल्थ केअर लि. कंपनी, अंबरनाथ, ठाणे एमआयडीसी मध्ये टेक्निशियन म्हणून नोकरीस असून सध्या ते तात्पुरते रसायनी, पनवेल येथे त्यांचे मित्रासोबत राहण्यास होते. अधून मधून ते आपले मूळगावी येत जात होते.

रविवारी दिनाक २९ रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास विनायक मोरे हे त्यांची दुचाकी होंडा शाईन (एमएच ४६बीएक्स ५२३२) वरून त्यांचे कंपनीत काम करणारा मित्र ईश्वर मुगळे हे गणेगाव येथून पनवेल येथे जाण्यासाठी निघाले. त्यावेळी मोरे हे दुचाकी चालवत होते. मध्यरात्री ते लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत माळीमळा येथे आले. त्यावेळी सोलापूर पुणे महामार्ग वर जय भवानी गँरेंजसमोर महामार्गालगत पाईप भरलेले ट्रक उभा होता. त्याला दुचाकी धडकू नये म्हणून मोरे यांनी तो ट्रक चुकवला व दुचाकी महामार्गा च्या खाली घेतली. परंतु दुर्दैवाने दुचाकीवरील ताबा सुटल्याने ते गँरेंजचे शेडच्या लोखंडी खाबाला उजवीकडुन धडकले व समोर जाऊन पडले. व दुचाकी त्या होर्डिंग च्या खाबाला धडकून अडकली. त्यामुळे मोरे व मुगळे यांच्या डोक्याला व हात पाय तसेच शरीरावर गंभीर जखमा झाल्याने ते जागेवरच मयत झाले. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहे.