आनंदाची बातमी ! भोरमधील दोन रूग्ण झाले बरे

चौघे संशयित तपासणीसाठी पुण्यात भोर : तालुक्यातील नसरापूर येथील पति पत्नीने करोनावर मात केल्याने त्यांना प्रशासनाने रविवारी सकाळी घरी सोडल्याचे उपविभागीय अधिकारी अधिकारी राजेंद्र जाधव यांनी

चौघे संशयित तपासणीसाठी पुण्यात
भोर :
तालुक्यातील नसरापूर येथील पति पत्नीने करोनावर मात केल्याने त्यांना प्रशासनाने रविवारी सकाळी घरी सोडल्याचे उपविभागीय अधिकारी अधिकारी राजेंद्र जाधव यांनी सांगीतले.३ रोजी या दोघांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर पुण्यातील रूग्णालयांत उपचार सुरू होते. आज सकाळी सोसायटीतील नागरिकांनी त्यांच्यावर फुले उधळून स्वागत केले. यापूर्वी करोनावर मात केल्यामुळे नेरे येथील दोन रूग्णांना ३ रोजी घरी  सोडले आहे. हे चार रूग्ण बरे झाल्यामुळे तालुक्यातील एकही रूग्ण पुण्यात उपचार घेत नसल्याचे तालुका वैदयकीय अधिकारी डॉ.सुनिल क-हाळे यांनी सांगीतले. दरम्यान वेल्हे तालुक्यातील वडगांव झांजे येथील एका पॉझिटिव्ह रूग्णांने भोर तालुक्यात संचार केल्यामुळे भोलावडे व मोहरी येथील प्रत्येकी दोन रूग्णांना संशयित म्हणून तपासणीसाठी पुण्यात रविवारी नेले आहे. तर आंळदेवाडी येथील दोन रूग्णांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान पांच मे पासून तालुक्यात पुणे, मुंबई व इतर ठिकाणांहून तीन हजार सहाशे नागरिक तालुक्यात आले आहेत. या सर्वांना प्राथमिक शाळा, सरकारी जागा, ग्रामपंचायत कार्यालयांत क्वारंटाईन केल्याचे तहसीलदार अजित पाटील यांनी सांगितले.