आंबेगाव तालुक्यात कोरोनाबाधित दोन रुग्ण आढळले ; एकूण रूग्ण संख्या चाळीसवर

भिमाशंकर : आंबेगाव तालुक्यात नारोडी येथे एक व पारगाव येथे एक असे दोन रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यात रुग्णांची संख्या ४० झाली असून त्यातील पाच बरे

भिमाशंकर : आंबेगाव तालुक्यात नारोडी येथे एक व पारगाव येथे एक असे  दोन रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.  त्यामुळे तालुक्यात रुग्णांची संख्या ४० झाली असून त्यातील पाच  बरे झाले असल्याचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी सांगितले.

        नारोडी येथील ६० वर्षे  वयाचा रुग्ण मुंबईहून २१ मे ला आठ जणांच्या कुटुंबासह आले होते. ३१ मे ला त्यांना त्रास सुरू झाल्याने पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. आणि काल रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. घरातील ८  व शेजारचे दोन जण अशा दहा जणांना होम कोरं टाईन केले आहे.

   तर पारगाव येथील रुग्ण मुंबईहून १६ मेला आला होता. त्यांचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला. तालुक्यातील रुग्णांत सर्वांत जास्त रुग्ण घाटकोपर मुंबई या भागातील रहिवासी असल्याचे दिसते. याभागातुन आलेल्या व्यक्तींना होम कोरंटाईन  चौदा दिवस करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नारोडी व पारगाव येथे तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, डॉ. सुरेश ढेकळे, पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांनी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना दिलेल्या तसेच संबंधित गावात जा- ये  करणारे रस्ते बंद करण्यात आले. तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण आढळले  त्यातील  पाच बरे झाले आहे. यामध्ये साकोरे येथील एक, जवळे एक ,शिनोली दोन, गिरवली एक असे आहेत.