दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली आणि…

दर्शन घेऊन घराकडे पायी चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेली

    पिंपरी। मंदिरात दर्शन घेऊन महिला घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. ही घटना चिखलीतील देहू-आळंदी रोड येथे घडली.

    मीराबाई मारुती इंदलकर (वय ५९, रा. चिखली) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी इंदलकर या सोमवारी (दि. ५) सायंकाळी त्यांच्या मैत्रिणीसोबत देहू-आळंदी रोडवरील क्रिस्टल सिटी रोड येथील महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन घेऊन घराकडे पायी चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेली. त्यांनतर हे चोरटे मोशीच्या लक्ष्मी चौकाच्या दिशेने पसार झाले. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करत आहेत.