पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावर दोन वाहनांची जोरदार धडक; वाहन चालकाचा जागीच मृत्यू

रविवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास पुणे - नाशिक महामार्गावर टेम्पो केबलचे बंडल घेऊन पुण्याकडून नाशिक बाजुकडे जात होता. दरम्यान नारायणगाव येथून भाजीपाला घेऊन पिकअप येत होती. थिगळ स्थळ येथे चासकमानधरणाच्या डाव्या कालव्या शेजारी या दोन्ही वाहनाची समोरा जोरदार धडक झाली.

    राजगुरुनगर : पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावर दोन वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने दोन्ही वाहन चालकांचा जागीच मुत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास पुणे – नाशिक महामार्गावर टेम्पो केबलचे बंडल घेऊन पुण्याकडून नाशिक बाजुकडे जात होता. दरम्यान नारायणगाव येथून भाजीपाला घेऊन पिकअप येत होती. थिगळ स्थळ येथे चासकमानधरणाच्या डाव्या कालव्या शेजारी या दोन्ही वाहनाची समोरा जोरदार धडक झाली. या अपघातात पिकअप चालक प्रदिप बरकडे व गुजरात येथील टेम्पो चालक हे दोघे जण जागीच ठार झाले.

    दरम्यान,  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने रस्त्यातून बाजुला केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.