प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

शनिवारी रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी आशुतोष हे त्यांचा मित्र प्रसन्न याला त्याच्या घरी सोडण्यासाठी दुचाकीवरून जात होते. सहायोगनगर तळवडे येथील गवळी शाळेजवळ आले असता आरोपी अक्षय आणि सम्या हे दोघे दुचाकीवरून आले. माझ्या दुचाकीला तुझी दुचाकी आडवी का घातलीस, असे म्हणत त्यांनी वाद घातला.

    पिंपरी : दुचाकीवरून मित्राला घरी सोडण्यासाठी जात असताना पाच जणांनी मिळून दोघांवर खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी रात्री सहयोगनगर, तळवडे येथे घडली.

    आशुतोष रमेश यादव (वय २३, रा. रुपीनगर, तळवडे), प्रसन्न मलप्रभु पवार (वय २४, रा. सहायोगनगर, तळवडे) अशी जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी आशुतोष यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय ससाणे (रा. ओटास्कीम, निगडी), सम्या (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही), प्रतीक पाटील (रा. सहायोगनगर तळवडे), साहिल राऊत (रा. रुपीनगर तळवडे), राहुल जाधव (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी आशुतोष हे त्यांचा मित्र प्रसन्न याला त्याच्या घरी सोडण्यासाठी दुचाकीवरून जात होते. सहायोगनगर तळवडे येथील गवळी शाळेजवळ आले असता आरोपी अक्षय आणि सम्या हे दोघे दुचाकीवरून आले. माझ्या दुचाकीला तुझी दुचाकी आडवी का घातलीस, असे म्हणत त्यांनी वाद घातला.

    त्यानंतर आरोपी सम्या याने अन्य आरोपींना बोलावून आणले. आरोपींनी लाकडी दांडक्याने तसेच आरोपी अक्षय याने एका घराच्या भिंतीवर ठेवलेली झाडासह कुंडी फिर्यादी यांच्या पाठीत आणि त्यांचा मित्र प्रसन्न याच्या तोंडावर मारून गंभीर जखमी केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.