प्रतिकात्मक फोटो 
प्रतिकात्मक फोटो 

दौंड :प्रतिनिधी दौंड -बारामती या मार्गावर रविवारी (दि 6)रात्री पावणेबाराच्या सुमारास एका दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अक्षय अनिल पांढरे (रा. गोपाळवाडी, ता. दौंड) असे अपघातात मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

दौंड :प्रतिनिधी दौंड -बारामती या मार्गावर रविवारी (दि . ६)रात्री पावणेबाराच्या सुमारास एका दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अक्षय अनिल पांढरे (रा. गोपाळवाडी, ता. दौंड) असे अपघातात मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अक्षय अनिल पांढरे हा आपल्या मित्रासोबत रात्रीच्या वेळी घरी येत असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये अक्षय याचे शीर शरीरापासून वेगळे झाले होते . तर त्याचा दुसरा साथीदार श्याम विठ्ठल माने हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे. हा अपघात ज्या ठिकाणी झाला, त्याठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे. अनेक वेळा याबाबत नागरिकांनी तक्रार करून देखील या रस्त्याच्या कामाकडे रस्ते विकास महामंडळ व संबंधित ठेकेदाराने कानाडोळा केला आहे. त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरत आहे .या रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत, तर अनेक जण जखमी झाले आहेत. रविवारी (दि . ६)त्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला अशा या मुजोर अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.