खेड तालुक्यात दोन युवकांची निर्घृणपणे हत्या

  • आज शनिवार सकाळच्या सुमारास या दोघांचे मृतदेह खेड तालुक्यातील खापदरा डोंगरावर आढळून आले आहेत. या घटनेमुळे येथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी खापदरा डोंगरावर दोन युवकांचे मृतदेह आढळून आले.

खेड तालुक्यात दोन युवकांची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज शनिवार सकाळच्या सुमारास या दोघांचे मृतदेह खेड तालुक्यातील खापदरा डोंगरावर आढळून आले आहेत. या घटनेमुळे येथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी खापदरा डोंगरावर दोन युवकांचे मृतदेह आढळून आले. या दोन्ही युवकांवर कोयता आणि तिक्ष्ण हत्याराचा वापर करून त्यांच्यावर वार करण्यात आले होते.

एका युवकाच्या चेहऱ्यावर आणि मानेवर कोयत्याने वार करण्यात आले. तर दुसऱ्या युवकाच्या हातावर आणि मानेवर कोयत्याने वार केले आहे. त्यामुळे या दोन्ही युवकांची ओळख अजून पटलेली नाही.  येथील स्थानिकांनी दोन्ही युवकांचे मृतदेह पाहिल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर या गंभीर प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाची तपासणी केली. तसेच दोन्ही युवकांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.

या प्रकरणाची चाचपणी पोलिसांनी केली असता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या दोन्ही युवकांना कोणी मारले, यामागील नक्की काय कारण आहे. हे अद्याप अस्पष्ट आहे. तसेच या सर्व प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत.