स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांकडून तहसीलदारांच्या नावाने हप्ते गोळा करण्याचा प्रकार?

दौंड तालुक्यातील वाटलूज येथील नागरिकांचा आरोप दौंड : दौंड तालुक्यातील वाटलूज येथील भीमा नदी पत्रातील बेकायदेशीर वाळू उपसा प्रकरणी वाळू माफियांकडून तहसीलदार यांच्या नावाने

दौंड तालुक्यातील वाटलूज येथील नागरिकांचा  आरोप  

दौंड :  दौंड तालुक्यातील वाटलूज येथील भीमा नदी पत्रातील बेकायदेशीर वाळू उपसा प्रकरणी वाळू माफियांकडून तहसीलदार यांच्या नावाने मंडल अधिकारी दर आठ दिवसाला हप्ते जमा करत असल्याची चर्चा परिसरात जोमात चालू आहे

वाटलूज हद्दीतील दिवसाढवळ्या भीमा नदी पत्रात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा जोमात चालू आहे, स्थानिक महसूल अधिकाऱ्यांचे वाळू उपसामध्ये हात चांगलेच लाल होत असल्याने कारवाई बडगा उचलण्यास संकोच करत आहेत, तसेच मंडल अधिकारी मंगेश नेवसे व शशिकांत सोनवणे यांचे वाळू माफियांसोबत लागेसंबंध असल्याने महसूल विभागाकडे तक्रार करण्यात स्थानिक नागरिक समोर नाहीत, तसेच नागरिकांनी वाळू उपसाचे फोटो व व्हिडिओ पाठविले असता संबंधित महसूल अधिकारी फोटो व विडिओ वाळू माफियांना देऊन तक्रारदाराकडे पहा असे सांगत आहेत, तक्रारदाराची पूर्ण माहितीच संबंधित शासकीय अधिकारीच उघड करत आहे, नदी पत्रातील वाळू उपसा प्रकरणी तक्रार केल्याने वाळू माफिया घरी जाऊन तक्रारदारावर दमदाटी करत असल्याचे प्रकार घडत आहेत,

तसेच वाटलूज व परिसरातील गावातील भीमा नदी पत्रातील बेकायदेशीर वाळू उपसा प्रकरणी मंडळ अधिकारी मंगेश नेवसे हे दौंड तहसीलदार यांच्या नावाने आठ दिवसांना दहा ते पंधरा हजार रुपये पैसे जमा करत असल्याची चर्चा परिसरात जोमात चालू आहे, यामुळे भीमा नदी पत्रातील वाळू उपसा करणाऱ्या माफियांवर कारवाई करण्यास मंडल अधिकारी नेवसे जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे, याबाबत मंडळ अधिकारी नेवसे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहे, 

दरम्यान, वरिष्ठांनी नदी पत्रातील बेकायदेशीर वाळू उपसा प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठी यांची जिल्हा अधिकारी यांनी चौकशी करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत, तसेच वाळू माफियांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे, 

“वाटलूज येथील भीमा नदी पत्रातील वाळू उपसा प्रकरणी पथक केले असून काही दिवसात कारवाई केली जाईल, तसेच दौंड तालुक्यातील चार स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव वरिष्ठांना पाठविले आहेत.”

– संजय पाटील (तहसीलदार, दौंड)