उदयनराजे भेटणार संभाजीराजेंना, मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व

संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारपासून मोर्चाची घोषणा केलीय. कोल्हापुरातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर छत्रपती संभाजीराजेंनी महाराष्ट्राचा दौरा केला होता. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली होती. मात्र या सगळ्यात उदयनराजे भोसलेंसोबत त्यांची भेट झाली होती. आता या दोघांची भेट ठरली असून पुण्यात ही भेट होणार आहे. 

    महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरदार गाजत आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्यानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला सुरुवात होत आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या या आंदोलनापूर्वी आज (शुक्रवारी) संभाजीराजे छत्रपती यांच्या भेटीला छत्रपती उदयनराजे भोसले जाणार आहेत. पुण्यात ही भेट होणार आहे.

    संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारपासून मोर्चाची घोषणा केलीय. कोल्हापुरातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर छत्रपती संभाजीराजेंनी महाराष्ट्राचा दौरा केला होता. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली होती. मात्र या सगळ्यात उदयनराजे भोसलेंसोबत त्यांची भेट झाली होती. आता या दोघांची भेट ठरली असून पुण्यात ही भेट होणार आहे.

    मराठा आरक्षणाबाबत पुढची दिशा आणि धोरण काय असावं, याबाबत या बैठकीत चर्चा होईल, अशी अपेक्षा आहे. छत्रपतींचे वारस म्हणून या दोन नेत्यांबाबत महाराष्ट्रात आदराचं स्थान आहे. मराठा आरक्षणासाठी हे दोन्ही नेते कार्यरत असून वेळोवेळी होणाऱ्या आंदोलनांना त्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. आता छत्रपती संभाजीराजे स्वतःच आंदोलन सुरू करत असल्यामुळे त्याला एक वेगळं राजकीय महत्त्व महाराष्ट्रात निर्माण झालंय.

    या आंदोलनाला महाविकास आघाडी सरकार कसा प्रतिसाद देतं आणि हे आंदोलन कसं हाताळतं, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. यापूर्वीच्या भाजप सरकारच्या काळात जोरदार मराठा आंदोलन पाहायला मिळालं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारनं आरक्षणाची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली होती. सर्वोच्च न्यायालयात हा मुद्दा गेला होता. मात्र त्यानंतर सरकार बदललं तरी ही प्रक्रिया सुरुच होती. अखेर सर्वोच्च न्यायालयानं हे आरक्षण घटनेला धरून नसल्याचं सांगत ते