चादर टाकून चालकाला दाबून ठेवले..  नंतर ट्रकमधून २० लाख रुपयांचे ऑटोमोबाईल पार्ट चोरले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंदनशिवे हे ट्रक चालक आहेत. बुधवारी रात्री ते त्यांच्या ट्रकमध्ये कुरुळी येथे झोपले होते. पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास अनोळखी चारजण आले. त्यांनी फिर्यादी यांना हाताने मारहाण करून ट्रकची चावी घेतली. चंदनशिवे यांच्या अंगावर चादर टाकून त्यांना दाबून ठेवले.

    पिंपरी :  ट्रकमध्ये झोपलेल्या चालकाच्या अंगावर चादर टाकून चालकाला दाबून ठेवत ट्रक नेऊन ट्रकमधून २० लाख रुपयांचे ऑटोमोबाईल पार्ट जबरदस्तीने काढले. हा प्रकार बुधवारी पहाटे खेड तालुक्यातील कुरुळी ते महाळुंगे या मार्गावर घडला. याबाबत रवी सुभाष चंदनशिवे (वय ४७, रा. वाघोली) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनोळखी चार चोरट्यांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंदनशिवे हे ट्रक चालक आहेत. बुधवारी रात्री ते त्यांच्या ट्रकमध्ये कुरुळी येथे झोपले होते. पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास अनोळखी चारजण आले. त्यांनी फिर्यादी यांना हाताने मारहाण करून ट्रकची चावी घेतली. चंदनशिवे यांच्या अंगावर चादर टाकून त्यांना दाबून ठेवले. ट्रक चालू करून तो महाळुंगे पर्यंत चालवत नेला. या कालावधीत आरोपींनी गाडीतील १९ लाख ९९ हजार ४०५ रुपये किमतीचे सब असेम्ब्ली मोटार युनिटस्टार्टर (ऑटोमोबाईल पार्ट) दुस-या गाडीत काढून घेतले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.