धक्कादायक! काकाच्या भितीने पुतणीने गॅलरीतून उडी मारली

पुणे : काकाच्या भितीने पुतणीने गॅलरीतून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. चुलत्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून या मुलीने आत्महत्या केल्याचे समजते.

या प्रकरणी पीडितेच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गौरव सोपान नारखेडे (वय ३०) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार महिलेच्या पतीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्या मुलीसह भोसरी येथे एकट्या राहतात. त्यांची मुलगी सुटीसाठी संभाजीनगर येथे आपल्या चुलत्याकडे गेली होती. त्या वेळी चुलत्याने पुतणीच्या विनयभंग केला. यानंतर वारंवार तो असे प्रकार करत असल्याने मुलीने गॅलरीतून उडी घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.