पोहायला गेलेल्या काका-पुतण्याचा बुडून मृत्यू

भिमाशंकर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून गावी आलेले कोलदरे (ता आंबेगाव ) येथील रहिवासी उल्हास काळे व रोहन काळे या चुलते व पुतणे यांचा घोड नदीपात्रात पोहताना बुडून

 भिमाशंकर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून गावी आलेले कोलदरे (ता आंबेगाव ) येथील रहिवासी  उल्हास  काळे  व रोहन काळे या चुलते व पुतणे यांचा घोड नदीपात्रात पोहताना बुडून मृत्यू झाला. त्याच्या अपघाती निधनाने गावात व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी,  कोरोना च्या पार्श्वभूमीवर उल्हास हिरामण काळे (वय ४२)व रोहन राजेंद्र काळे (वय १८) यांचे कुटुंब एक महिन्यापूर्वी गावी आले होते. रोहनने  नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. उल्हास यांचा मुंबई येथे कॉम्प्युटर स्पेअर पार्टचा व्यवसाय होता. आज दुपारी एकच्या सुमारास घोडनदीवर म्हसोबाचा डोह येथे पोहण्यासाठी गेले होते. त्यांच्याबरोबर इतर लहान मुले होती .उल्हास व रोहन  हे  पोहण्यासाठी नदीत उतरले त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले तीरावर उभी असलेली त्यांच्या घरातील इतर मुले यांनी आरडाओरडा केला .घरी मोबाईल वरून फोन केले .पंधरा ते वीस मिनिटात गावातून लोक आले .त्यांनी दोघांनाही खाजगी गाडीतून  घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात नेले .परंतु वेळ खूप झाला होता .वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रतापराव चिंचोलीकर यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.  सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव करत आहे.