भोरमध्ये अस्वच्छ पाण्याचा पुरवठा

-बिलावरून सत्ताधा-यांमध्ये सुंदोपसुंदी भोर : शहरातील चौपाटी,रामबाग,वेताळपेठ,धुमाळनगर,श्रीपतीनगर,मंगळवार पेठेच्या निम्म्या भागांत गेल्या कांही दिवसापासून माती मिश्रीत, अस्वच्छ,काळया रंगाचे पाणी

-बिलावरून सत्ताधा-यांमध्ये सुंदोपसुंदी

भोर : शहरातील चौपाटी,रामबाग,वेताळपेठ,धुमाळनगर,श्रीपतीनगर,मंगळवार पेठेच्या निम्म्या भागांत गेल्या कांही दिवसापासून माती मिश्रीत, अस्वच्छ,काळया रंगाचे पाणी पुरवठा होत आहे.नागरिकांनी तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.तशातच कोरोनाच्या सावटाखाली असलेल्य नागरिकांच्या मनांत अस्वच्छ पाणी प्यायल्यामुळे आजारी पडण्याची भिती वाढू लागली आहे.अशा परीस्थितीत जलशुध्दीकरणाचे काम करणा-या ठेकेदाराचे बिल देण्यास माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिन्दे,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धारणे,शिवसेनेचे नितीन सोनावले, भाजपाचे नितीन मांडके आदींनी विरोध केला आहे.

फिल्टर नसलेले पाणी दिल्यामुळे ठेकेदाराचे बिल देउ नये अशी मागणी त्यांनी केली आहे.तर नगर परिषदेच्या सत्ताधारी पक्षात ‘सुंदोपसुंदी’ सुरू आहे. गेल्या वर्षी आँगस्टअखेर झालेल्या अतिवृष्टीने भाटघर पाणी पुरवठा योजनेची सर्व यंत्रणा व विहीर पाण्यात बुडाल्याने शहराचा पाणीपुरवठा बंद पडला होता.त्यामुळे तातडीने निरा देवघर धरणाच्या कँनालमधून पर्यायी योजनेव्दारे पाणी पुरवठा सुरू केला. त्यावेळी नगरपरिषदेने जलशुध्दीकरणासाठी दरमहा अडीच लाख रूपयांप्रमाणे पुण्यातील‘स्वामीराज कॉर्पोरेशन’ या एजन्सीबरोबर एक वर्षाचा करार केला आहे. कराराची मुदत येत्या सप्टेंबरपर्यंत आहे.येथील शंकरहील पाणी केंद्रात दोन व दिड द.ल.मि.ली.चे दोन वॉटर फिल्टर आहेत. त्यातूनशहराला लागणारे पस्तीस लाख लीटर पाणी शुध्द होणे अपेक्षित आहे.पंरतू दोन्ही फिल्टरची कार्यक्षमताकमी झालेली आहे.शिवाय पाणी गळती यामुळे जेमतेम पंचवीस लाख लीटर पाणी फिल्टर होत आहे.दरम्यान जानेवारी पासून भाटघर योजनेतील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे.त्यामुळे फिल्टरपाणी वगळता कमी पडणा-या पाण्याचा थेट पुरवठा त्यातून करण्यात येत आहे.हे पाणी माती मिश्रीत, अस्वच्छ, काळया रंगाचे आहे.स्वामीराज कॉर्पोरेशनने नगरपरिषदेकडे जानेवारी पासूनच्या बिलासाठी तगादा लावला आहे.त्याला कांही नगरसेवकांनी अप्रत्यक्ष पाठींबा दर्शविल्याने सत्ताधा-यांमधील सुंदोपसुंदी समोर आली आहे. मात्र नगराध्यक्षा निर्मला आवारे यांनी माहीती घेउनच याबाबत विचार करू अशी ठाम भूमिका घेतली आहे.त्यावर नगरपरिषदेने त्यांना ‘सदर ठेकेदाराने १८ मे नंतर काम करण्यास असमर्थता दाखवली आहे.कोरोनाच्या काळांत फिल्टर यंत्रणा बंद पडल्यास अस्वच्छ पाण्यामुळे आजार,साथ उद्भवण्याची शक्यता आहे. साथ रोगनियंत्रणासाठी शासनाने सूचना दिलेल्या असल्याने ठेकेदाराचे बिलदेणेबाबत निर्णय घ्यावा. अन्यतः नगरपरिषद अधिनियम २०१८ नुसार सदचे बिल अदा केले जाईल.’अशा आशयाचे पत्र दिले आहे.

‘फिल्टरची कार्यक्षमता कमी झाली आहे,पाणी गळती यामुळे आवश्यक तितके पाणी फिल्टर होत नाही.त्यामुळे काही भागांतअस्वच्छ पाणी पुरवठा होत आहे.तातडीने मार्ग काढून स्वच्छ,फिल्टरचे पाणी सर्वांना दिले जाईल’.

-डॉ.विजयकुमार थोरात.मुख्याधिकारी.

‘अस्वच्छ पाण्याबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत.याबाबत संपूर्ण पाहणी करून नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या चार महीण्यातील जलशुध्दीकरणाच्या कामाची माहीती घेउनच ठेकेदाराच्या बिलाबाबत निर्णय घेतला जाईल’.

-निर्मला आवारे, नगराध्यक्षा.