दुर्दैवी घटना ! दुचाकीला कारने धडक  दिल्याने अपघातात माजी सैनिकांचा मृत्यू ; सासवड येथे पालखी मार्गावर घडला अपघात

-कारचालक डॉक्टरवर गुन्हा दाखल

    सासवड : पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर सासवड जवळ दुचाकीला कारने पाठीमागून धडक दिल्याने दिवे येथील दुचाकी स्वार माजी सैनिकाचा मृत्यू झाला आहे. याबाबत सासवड पोलिस ठाण्यात कारचालक डॉक्टर वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंगळवार दि १३ रोजी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास सासवड येथील हुंदाई शोरुम समोर हा अपघात झाला. लक्ष्मण ज्ञानदेव अढागळे (वय ५५रा जाधववाडी ता पुरंदर)हे माजी सैनिक नाव आहे या बाबत सासवड येथील धन्वंतरी हाॅस्पीटलचे प्रमुख डॉ अमोल हेंद्रे यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

    मृत लक्ष्मण अढागळे यांच्या मुलागा निखिल लक्ष्मण अढागळे यांने सासवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे फिर्यादी नुसार माजी सैनिक लक्ष्मण अढागळे सासवड येथील एस बी आय या बॅंकेत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करीत होते कामांवर जाण्यासाठी आपली दुचाकी (एम एच १२डि डब्ल्यु ९७८६) वरून निघाले होते सासवडच्या हुंदाई शोरुम समोर डॉ अमोल हेंद्रे यांनी त्यांच्या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली (कार क्रमांक एम एच १२केवाय२५२५) रात्री १२ च्या सुमारास जाधववाडी येथील श्रीकांत जाधव यांनी निखिल याला अपघाताची माहिती दिली तो पर्यंत अढागळे यांना धन्वंतरी हाॅस्पीटल मधील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते

    अढागळे कुटुंबीय व जाधववाडी ग्रामस्थ हाॅस्पीटलमध्ये आले असता लक्ष्मण अढागळे बेशुद्ध अवस्थेत होते त्या नंतर त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
    दि १४ च्या राञी पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात ऊपचारा दरम्यान मृत्यू झाला पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. फिर्याद दाखल करून घेण्यास विलंब होत असल्याने गुरुवारी (दि १५) दुपारी हा मृतदेह घेऊन मृताचे नातेवाईक ग्रामस्थ यांनी सासवड पोलिस ठाणे गाठले फिर्याद दाखल करून घेत असल्याचे पोलिसांनी सांगितल्या नंतर परिस्थिती शांत झाल्याचे जाधववाडी ग्रामस्थांनी सांगितले.