प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

इंदापूर  :   अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ४२ वर्षे वयाच्या अनोळखी इसमाचा अपघाती मृत्यू झाला.लोणी देवकर गावच्या हद्दीत पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोलापुर लेनवर हॉटेल आम्रपाली समोर मंगळवारी (दि.२२ सप्टेंबर) सकाळी सात वाजण्यापूर्वी ही घटना घडली.या संदर्भात होमगार्ड विशाल विलास येडे यांनी फिर्याद दिली आहे.त्यांच्या फिर्यादीनूसार अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकविरुध्द इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  सविस्तर हकीकत अशी की,दि.२१ सप्टेंबर रोजी रात्री फिर्यादी येडे हे हवालदार सोनवणे यांच्यासह लोणी देवकर एमआयडीसी चौकी येथे नाईटड्युटी करत होते.त्यावेळी लोणी देवकर येथे सोलापुर बाजुकडे जाणा-या एका वाटसरुने, हॉटेल आम्रपाली समोर अपघात झाल्याचे कळवले.
हवालदार सोनवणे यांच्यासह फिर्यादी अपघाताच्या ठिकाणी गेले.पुणे ते सोलापुर लेनवर हॉटेल आम्रपाली समोर रस्त्याने पायी प्रवास करणा-या ४०ते ४२ वर्षे वयाच्या अज्ञात इसमास अज्ञात वाहनाने धडक देवुन अपघात केला.त्या अपघातात अज्ञात इसमाच्या दोन्ही पायांना व कमरेला गंभीर जखमा होवून जागीच मयत झाल्याचे त्यांना आढळून आले.मंगळवारी सकाळी सात वाजण्यापूर्वी ही घटना घडल्याचे चौकशीअंती समजले.त्यानूसार त्यांनी, आपल्या ताब्यातील अज्ञात वाहन रस्ता वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात चालवुन रस्त्याने पायी चालणा-या अज्ञात इसमाला धडक देवून त्याच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरुन अज्ञात वाहन चालकाविरुध्द फिर्याद दिली.