केंद्रीयमंत्री भारती पवार यांच्या सूचना अद्याप आमच्यापर्यंत नाहीत : बाळासाहेब पाटील

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : दर दोन वर्षांनी टोमॅटोचे उत्पादन राज्यासह देशात मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे दराचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांनी केलेल्या सूचना अद्याप आमच्यापर्यंत आल्या नाहीत, त्याची आम्ही माहिती घेतली आहे. त्याप्रमाणे पणन मंडळ पुढील कार्यवाही करेल, अशी माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

    पाटील म्हणाले, सध्या टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. त्यामुळे टोमॅटोला दर नसल्याने हजारो टन टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याचे वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यावर केंद्र सरकाने एमआयएस स्किम अंतर्गत राज्य सरकाने टोमॅटो खरेदी करावेत आणि त्याची विक्री करावी, असा उपाय केंद्राने सूचविला आहे. खरेदी-विक्री व्यवहारात राज्याला जो तोटा होईल, त्याची ५० टक्के रक्कम केंद्र सरकार देईल.

    राज्य सरकारने याबाबत केंद्राला प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी शुक्रवारी (दि. २७) केल्या होत्या. मात्र, याबाबत राज्याला अजून काही सूचना आल्या नाहीत, असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.