केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

- नाशिक, महाडनंतर पुण्यात तिसरा गुन्हा दाखल ; शिवसैनिक आक्रमक

    पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर नाशिक आणि महाडमध्ये गुन्हे दाखल झाल्यानंतर पुण्यात देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. दरम्यान नाशिक पोलीस राणे यांना अटक करण्यासाठी रवाना झाल्याचे समजते. यामुळे मात्र राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.पुण्यातील चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्यावर भादवी कलम 153 व 505 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रोहित कदम यांनी तक्रार दिली आहे.

    भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कणकवलीत सोमवारी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एका प्रकरणात बोलताना खालच्या पातळीवर टिका केली. त्यानंतर राणे व शिवसेनेत वाद सुरू झाला आहे.शिवसैनिक चांगलाच राडा घालत आहेत. नाशिक शहरात पहिली तक्रार राणे यांच्या विरोधात दाखल झाली. त्यानंतर महाड आणि आता तिसरी तक्रार पुण्यात दाखल झाली आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल केला असल्याचे सांगितले आहे. रोहित कदम हे शिवसैनिक आहेत.