अनोखे अभिवादन! गव्हाच्या दाण्यातून साकारले ‘अटलजीं’ चे रेखाचित्र

गव्हाच्या दाण्यापासून अटलजींचे भव्य रेखाचित्र रेखाटण्यात आले. या रेखाटनासाठी ९६ किलो गव्हाचा वापरणयतात आला होता.

अनोखे अभिवादन! गव्हाच्या दाण्यातून साकारले अटलजींचे रेखाचित्र

पुणे: भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त निनाद पतसंस्था आणि कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयातर्फे गव्हाच्या दाण्यापासून अटलजींचे भव्य रेखाचित्र रेखाटण्यात आले. या रेखाटनासाठी ९६ किलो गव्हाचा वापरणयतात आला होता. सदाशिव पेठेतील ‘अटल कट्टा’ येथे चित्र साकरण्यात आले आहे. कलातीर्थचे अमोल काळे यांनी हे चित्र साकारले. जयंतीनिमित्त जवळपास १ क्विंटल किलो गहू वंचित विकास या संस्थेस देण्यात भेट म्हणून देण्यात आले.