कासारीच्या उपसरपंचपदी किरण रासकर यांची बिनविरोध निवड

शिक्रापूर : कासारी ता. शिरूर येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी किरण महादू रासकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कासारी ता. शिरूर ग्रामपंचायत चे उपसरपंच गणपतराव काळकुटे यांनी आपल्या पदाचा

शिक्रापूर :  कासारी ता. शिरूर येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी किरण महादू रासकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कासारी ता. शिरूर ग्रामपंचायत चे उपसरपंच गणपतराव काळकुटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी सरपंच सुनिता भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी किरण रासकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून लता ठुबे तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून बी. बी. शेळके  यांनी काम पाहिले. यावेळी गणपतराव काळकुटे, गोपाळ भुजबळ, स्नेहल भुजबळ, स्वाती नवले, रोहिणी रासकर यांसह आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. निवडीनंतर नवनिर्वाचित उपसरपंच किरण रासकर यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना सर्व सदस्यांना व ग्रामस्थांना बरोबर घेऊन गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बोलताना रासकर यांनी सांगितले. यावेळी संतोष नवले यांनी उपस्थितांचे आभार मानले.