वाडेबोल्हाई ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी समीर भोर यांची बिनविरोध निवड

वाघोली:श्री.क्षेत्र वाडेबोल्हाई(ता.हवेली) येथील  ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी समीर ज्ञानेश्वर भोर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.लता शिंदे यांनी त्यांच्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने ही उपसरपंच पदाची जागा रिक्त होती.या रिक्त जागेवर आज वाडेबोल्हाई ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पदाची निवडणूक ही शासनाच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीचे सरपंच दिपक गावडे यांच्या अध्यक्षतेखाली व आदर्श ग्रामविकास अधिकारी अनिल बगाटे यांच्या अधिपत्याखाली पार पडली.

याप्रसंगी कोरोनाग्रस्त परिस्थितीचा आढावा घेऊन नवनिर्वाचित उपसरपंच समीर भोर यांचा सत्कार सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच कुशाभाऊ गावडे,सरपंच दिपक गावडे,माजी उपसरपंच संजय भोरडे पाटील यांच्या हस्ते पार पडला.याप्रसंगी बोल्हाई देवी देवस्थानचे चेअरमन विठ्ठल गावडे,वाडेबोल्हाई पंचक्रोशी प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष मल्हारी गावडे महाराज,माजी उपसरपंच अंकुश भोर,ग्रामविकास अधिकारी अनिल बगाटे,माजी उपसरपंच अशोक इंगळे,माजी उपसरपंच सुरेखा भोरडे,माजी उपसरपंच सुरज भोरडे,सुरेखा गावडे,लता शिंदे,सविता गावडे,वनिता गावडे,मुकींदा शिंदे,हारुबाई गावडे,संध्या भोर,कृषी उद्योजक नितीन गावडे,सोपान गावडे,दत्तात्रय शिंदे,बोल्हाई माता भजनी मंडळाचे अध्यक्ष संदीप गावडे,प्रवीण भोर,उमेश साळुंखे,नाना शिंदे,भाऊ शिंदे,ग्रामपंचायतीचे लिपिक किरण थोरात,अश्विनी भोर,सुप्रिया पवार,कर्मचारी दादा जाधव,पिंटू शिंदे,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

कोरोनाग्रस्त काळात गावचा विकास कसा करता येईल यासाठी सरपंच,उपसरपंच,सर्व ग्रामपंचायत सदस्य प्रयत्न करतील.पदापेक्षा गावचा विकास महत्वाचा असून ते नवनिर्वाचित उपसरपंच समीर भोर करून दाखवतील असा विश्वास आहे.

-कुशाभाऊ गावडे,माजी सरपंच-वाडेबोल्हाई.