सेवानिवृत्ती नंतरही प्रशासनाला सहकार्य म्हणून विनामोबदला नोकरी

शिक्रापूर : पाटबंधारे विभागात तब्बल ३८ वर्षे सेवा बजावून काही दिवसांपूर्वी खडकवासला पाटबंधारे विभागाकडून सहाय्यक स्थापत्य अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्याने कोरोना परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य म्हणून निवृत्तीनंतर काही दिवस विना मोबदला काम करण्याचा निर्णय घेत समाजापुढे अनोखा आदर्श निर्माण केला आहे.

 कुटुंबियांचा विरोध असताना धोंडिभाऊ भागवत यांचा आगळावेगळा आदर्श

 
शिक्रापूर : पाटबंधारे विभागात तब्बल ३८ वर्षे सेवा बजावून काही दिवसांपूर्वी खडकवासला पाटबंधारे विभागाकडून सहाय्यक स्थापत्य अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्याने कोरोना परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य म्हणून निवृत्तीनंतर काही दिवस विना मोबदला काम करण्याचा निर्णय घेत समाजापुढे अनोखा आदर्श निर्माण केला आहे.
                शिक्रापूर ता. शिरूर येथील पाठबंधारे विभागात नोकरी करून आदर्श निर्माण करणारे धोंडिभाऊ मारुती भागवत हे नोकरीतून ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले, तर सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला तातडीची भरती प्रक्रिया राबविणे शक्य नसल्याने भागवत यांच्या जागेवर माणूस नेमणे देखील शक्य नाही त्यामुळे आपणच काही काळ विनामोबदला नोकरी करावी असा निर्णय धोंडिभाऊ भागवत यांनी घेतला, यावेळी भागवत यांच्या प्रकृतीची काळजी म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना नोकरीस विरोध केला परंतु तरी देखील कुटुंबीयांचा विरोध असतानाही प्रशासनाला सहकार्य करण्याच्या हेतूने काही दिवस काम करण्याच्या भूमिकेवर धोंडिभाऊ भागवत ठाम राहिले, १ ऑक्टोबर १९८२ रोजी रोजी शासकीय सेवेत रजू झाल्यानंतर तब्बल २० वर्षे चासकमान प्रकल्प शिक्रापूर येथे सेवा केली. शिक्रापूर पाटबंधारे विभागातील तत्कालीन कार्यरत अधिकारी एन डी गायकवाड, उद्धव मुंढे, राजेश भावसार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना फक्त शासकीय कर्मचारी नव्हे तर संपूर्ण शिक्रापूर गावातील व पंचक्रोशीतील गावातील लोकांशी  सर्वांशी नेहमी हसून खेळून अतिशय नम्रपणे राहणारे धोंडिभाऊ भागवत यांची ओळख संपूर्ण शिक्रापूर मध्ये राहिली. शिक्रापूर येथून बदली झाल्यानंतर खडकवासला धरण येथे सात वर्षे अविरत सेवा केल्यानंतर ३१  मे २०२० रोजी शासकीय सेवेतून ते निवृत्त झाले परंतु सध्याच्या परीस्थितीमुळे नागरिकांची गैरसोय नको आणि प्रशासनाला सहकार्य मिळावे म्हणून सेवानिवृत्ती नंतर देखील काळी काळ विनामोबदला नोकरी करण्याच्या निर्णय घेवून शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या समोर आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे.