…तोपर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध हटविणे योग्य नाही; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे सुतोवाच

राजेश टोपे म्हणाले की राज्य सरकार सातत्याने माहिती घेत आहे मे च्या शेवटच्या आठवड्यात जर पॉझीटिव्हिटी रेट दहा टक्के किंवा त्यापेक्षा खाली आला असेल तरच निर्बंध काही प्रमाणात हटविण्याबाबत निर्णय घेता येणार आहेत. टोपे म्हणाले की तज्ज्ञांनी तिस-या लाटेबाबत धोका असल्याचे पूर्वीच सांगितले आहे त्यामुळे त्याकडे लक्ष देण्यासाठी यंत्रणा काम करत आहेत, मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री तज्ज्ञांशी चर्चा करूनच घेतील असे ते म्हणाले.

  पुणे : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १ जून नंतर अनलॉक प्रक्रीया पूर्णत: करण्याबाबत सांगितले आहे की, राज्यातील कोरोना साथ रोगाच्या सकारात्मकतेचा (पॉझीटिव्हीटी) दर दहा टक्के किंवा त्यापेक्षा खाली जात नाही तो पर्यंत टाळेबंदी निर्बंध सरसकट हटविणे योग्य होणार नाही.

  तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय मुख्यमंत्री घेतील

  राजेश टोपे म्हणाले की राज्य सरकार सातत्याने माहिती घेत आहे मे च्या शेवटच्या आठवड्यात जर पॉझीटिव्हिटी रेट दहा टक्के किंवा त्यापेक्षा खाली आला असेल तरच निर्बंध काही प्रमाणात हटविण्याबाबत निर्णय घेता येणार आहेत. टोपे म्हणाले की तज्ज्ञांनी तिस-या लाटेबाबत धोका असल्याचे पूर्वीच सांगितले आहे त्यामुळे त्याकडे लक्ष देण्यासाठी यंत्रणा काम करत आहेत, मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री तज्ज्ञांशी चर्चा करूनच घेतील असे ते म्हणाले.

  ५० टक्के पेक्षा जास्त रूग्णशय्या रिक्त हव्या

  टोपे म्हणाले की, राज्यात अद्यापही पॉझीटिव्ह रूग्ण सापडण्याचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे. राज्यातील रूग्णांलयावर या रूग्णांच्या देखभालीचा आणि औषधोपचारांचा ताण आहे, रूग्णालयात ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त रूग्णशय्या रिक्त ज्या भागात असतील त्या भागात काही प्रमाणात निर्बंध शिथील केले जावू शकतात. दुस-या लाटेचा अनुभव पाहता यावेळी तिसरी लाट अधिक सक्षमपणे हाताळण्याचे आव्हान असल्याने कोणताही धोका पत्करता येणार नसल्याचे ते म्हणाले.

  २३ जिल्ह्यात आजही १५ टक्के पेक्षा जास्त

  शनिवारी राज्याचा रूग्ण पॉझिटिव्ह सापडण्याचा दर १५ टक्के होता. ५ एप्रिल रोजी ज्यावेळी काही प्रमाणात निर्बंध कडक करण्यास सुरूवात झाली त्यावेळी राज्याचा हा दर २० टक्क्यांपेक्षा जास्त वाढण्यास सुरूवात झाली होती. ते म्हणाले की राज्याच्या २३ जिल्ह्यात आजही १५ टक्के पेक्षा जास्त बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण आहे. शनिवारी सायंकाळच्या माहितीनुसार देशातील १८ राज्यात हा दर १५ टक्केपेक्षा जास्त होता. तर महाराष्ट्रासह अन्य १४ राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात तो १० ते १७ टक्के दरम्यान होता.

  रविवार दिलासादायक

  दरम्यान, रविवारी (दि २३) रोजी सकाळी राज्याचा बाधित रूग्ण सापडण्याचा दर ९.२ टक्के असल्याचे सांगण्यात आले राज्यात २६१३३ बाधित रूग्ण होते, तर ६८२ जणांचा मृत्यू गत चोविस तासात झाल्याचे दिसून आले आहे.