मतदारांचे मतदार यादीमधील छायाचित्र अद्यावत करणार

पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या ३९९ यादी भागामधील १८ हजार २५६ मतदारांची छायाचित्रे मतदार यादीमध्ये नाहीत. त्यामुळे या प्रस्तावित मतदारांच्या नावाची प्रसिद्धी मुख्य निवडणूक अधिकारी, पुणे जिल्हाधिकारी आणि पिंपरी - चिंचवड महापालिका या तीनही संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

    पिंपरी : मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र अद्यावत करण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी सुनील अलमेलकर यांनी दिली.

    पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या ३९९ यादी भागामधील १८ हजार २५६ मतदारांची छायाचित्रे मतदार यादीमध्ये नाहीत. त्यामुळे या प्रस्तावित मतदारांच्या नावाची प्रसिद्धी मुख्य निवडणूक अधिकारी, पुणे जिल्हाधिकारी आणि पिंपरी – चिंचवड महापालिका या तीनही संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ज्या मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत नाहीत, त्यांनी त्यांचे छायाचित्र रहिवास पुराव्यासह पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे कार्यालय डॉ. हेडगेवार भवन, सेक्टर २६, निगडी प्राधिकरण येथे समक्ष अथवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे आठ दिवसांत जमा करण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी सुनील अलमेलकर यांनी केले आहे. ज्या मतदारांची या कालावधीत रहिवास पुरावा आणि छायाचित्र जमा होणार नाहीत, त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे