भाजपा नगरसेवकाची दादागिरी; महिला आरोग्य अधिकाऱ्यावर धावून जाण्याचा प्रयत्न

प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करण्यावरून आता नगरसेवक आणि अधिकारी यांच्यातील वाद विकोपाला जाऊ लागला आहे. केंद्र सुरू करण्यास अधिकारी प्रतिसाद देत नाही म्हणून भाजपाचे नगरसेवक धनराज घोगरे यांनी महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना रडू कोसळले. त्यातून महापालिकेत एकच गोंधळ उडाला. आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांच्यासमोरच हा प्रकार घडला.

    पुणे : प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करण्यावरून आता नगरसेवक आणि अधिकारी यांच्यातील वाद विकोपाला जाऊ लागला आहे. केंद्र सुरू करण्यास अधिकारी प्रतिसाद देत नाही म्हणून भाजपाचे नगरसेवक धनराज घोगरे यांनी महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना रडू कोसळले. त्यातून महापालिकेत एकच गोंधळ उडाला. आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांच्यासमोरच हा प्रकार घडला.

    लसीकरण केंद्रासाठी घोगरे आरोग्य विभागाकडे ते वारंवार पाठपुरावा करीत होते. मात्र, हा प्रस्ताव मंजूर होत नसल्याने दुपारी ते कार्यकर्त्यांसह आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांच्याकडे गेले. डॉ. जाधव या दुजाभाव करत असून, फोन उचलत नाहीत, प्रस्तावाबाबत प्रतिसाद देत नाहीत, अशी तक्रार घोगरे यांनी केली. यावरून त्यांच्यात खडाजंगी झाली.

    या घटनेनंतर नगरसेवकांकडून असे प्रकार होत असतील तर आम्ही काम कसे करणार, असा सवाल उपस्थित करीत, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ‘काम बंद’ करण्याचा इशारा महापौरांना दिला.