परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम

महापालिकेने नियोजन केले असून यासाठी 'मी जबाबदार' या अधिकृत अ‍ॅपद्वारे १ जूनपासून नोंदणी करता येणार आहे. यात शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, १८ ते ४४ वर्षे वयोगटातील दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी तसेच एक वर्षापेक्षा लहान बाळ असणाऱ्या स्तनदा मातांसाठी नवे लसीकरण केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे. आजारामुळे अंथरुणावर असलेले रुग्ण तसेच गतिमंद व्यक्तींना त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

    पिंपरी : पिंपरी चिंचवड़ शहरातून दरवर्षी हजारो विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी जातात. यंदाही अनेकांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. पण, त्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेले नसल्याने परदेशात जाताना अडथळा येऊ शकतो. तसेच सध्या १८ ते ४४ वयोगटातील महापालिकेचे लसीकरण बंद आहे, त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व पालकांनी लसीकरणासंदर्भात महापालिकेकडे मागणी केली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

    यासाठी महापालिकेने नियोजन केले असून यासाठी ‘मी जबाबदार’ या अधिकृत अ‍ॅपद्वारे १ जूनपासून नोंदणी करता येणार आहे. यात शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, १८ ते ४४ वर्षे वयोगटातील दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी तसेच एक वर्षापेक्षा लहान बाळ असणाऱ्या स्तनदा मातांसाठी नवे लसीकरण केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे. आजारामुळे अंथरुणावर असलेले रुग्ण तसेच गतिमंद व्यक्तींना त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.कोरोना रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम जलदगतीने राबविण्यासाठी महापालिकेच्यावतीने नवीन ड्राईव्ह – इन लसीकरण केंद्र सुरु होणार आहे. ड्राईव्ह – इन लसीकरण केंद्र लोकांना वाहनांमधून बाहेर न जाता लस शॉट घेण्याची परवानगी देण्यात येईल.